tuljapur, mahadev jankar, tuljabhavani temple saam tv
महाराष्ट्र

Tulja Bhavani Temple : संभाजीराजे असाे मी असू, आम्ही काय काॅमन मॅन आहाेत का? तुळजाभवानी मंदिरात महादेव जानकर संतापले

जनस्वराज्य यात्रेचा तुळजाभवानी देवीच्या आरतीने रासपचे नेते महादेव जानकर यांनी प्रारंभ केला.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Mahadev Jankar News : धाराशिवचे माजी पालकमंत्री तथा माजी कॅबिनेट मंत्री रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून आज (बुधवार) सुरक्षा रक्षकांनी रोखले. या घटनेनंतर जानकर यांनी संबंधित सुरक्षा यंत्रणेची ठेका मालकाकडे तक्रार करणार असल्याचे माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (Maharashtra News)

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून यापूर्वी युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले होते. आज (tuljapur) जानकर यांना राेखण्यात आले. त्यामुळे जानकर यांनी माध्यमांशी बाेलताना यंत्रणेवर संताप व्यक्त केला. त्यापू्वी गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेवुन महादेव जानकर मंदिराच्या बाहेर आले.

जानकर म्हणाले प्रशासनाने जनेतचे सेवक काेण आहेत हे तपासावे. आम्ही जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यभर, देशभर फिरत असताे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहाेत. याेग्य पद्धतीने मान सन्मान राखला पाहिजे. सत्ता येते आणि जाते हे त्यांनी लक्षात ठेवावे असेही जानकर यांनी नमूद केले.

जानकर पुढे बाेलताना म्हणाले ज्यांनी सुरक्षा यंत्रणेचा ठेका घेतला आहे त्या बीव्हीजी कंपनीचे मालक माझ्या गावचे (सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर) आहेत. त्यांच्याशी मी पुढच्या दहा मिनीटांत चर्चा करणार आहे. संभाजीराजे असाे अथवा आम्ही.. आम्ही काय सर्वसामान्य माणसं आहाेत का? असा सवाल जानकर यांनी माध्यमांसमाेर केला.

दरम्यान जानकर यांनी जनस्वराज्य यात्रेचा तुळजाभवानी देवीच्या आरतीने प्रारंभ केला. त्यावेळी रासपचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 31 जुलैला नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

ग्रीन टी की ब्लॅक टी? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा अधिक फायदेशीर?

ST bus Accident : एसटी बसची ट्रकला जोरात धडक, एकाचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

१० ऑगस्टला देश ठप्प होणार? CJP आणि शेतकऱ्यांचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन, जाणून घ्या नवा मास्टरप्लॅन

Alu Vadi Recipe : कांदा भजीसारखी कुरकुरीत होईल अळूवडी, आताच लिहून घ्या कोकण स्पेशल रेसिपी

SCROLL FOR NEXT