Mahadev Jankar On Congress and BJP Saam tv
महाराष्ट्र

Mahadev Jankar On BJP: 'काँग्रेस गद्दार तर भाजप हा महागद्दार, सत्तेची घमेंड BJP च्या डोक्यात गेलीय', महादेव जानकर यांची जोरदार टीका

Mahadev Jankar On Congress and BJP: 'काँग्रेस गद्दार तर भाजप हा महागद्दार, सत्तेची घमेंड BJP च्या डोक्यात गेलीय', महादेव जानकर यांची जोरदार टीका

साम टिव्ही ब्युरो

>> रणजीत माजगावकर

Mahadev Jankar On Congress and BJP: काँग्रेस पक्ष हा गद्दार आहे, तर भाजप हा पक्ष महागद्दार आहे. आता गोपीनाथ मुंडेचा भाजप राहिला नाही. सध्याचा भाजप हा देवेंद्र फडणवीसांचा झाला आहे. आम्ही गोपीनाथ मुंडेसाहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपशी युती केली होती. मात्र सध्या कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवून युती करावी, असे नेतृत्व ना काँग्रेसकडे, ना भाजपकडे त्यामुळे आम्ही कोणासोबत जायचे याचा निर्णय त्या - त्यावेळी आमच्या पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड घेईल. सध्याच्या भाजपच्या या धोरणामुळे भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही, असे सूचक वक्तव्य रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

जन स्वराज्य यात्रेच्यानिमित्ताने सांगली जिल्ह्यातील विटा दौऱ्यावर आलेल्या माजी मंत्री महादेव जानकर यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले, काँग्रेस पक्ष हा गद्दार आहे तर भाजप हा पक्ष महागद्दार आहे. हे सत्तेत येत नव्हते तेव्हा त्यांना जी दीड दोन टक्के मतांची गरज होती. आमच्याशी युती करून ती दीड दोन टक्के मते मिळवून सत्ता हस्तगत केली. त्यानंतर मात्र सत्तेचा घमंड त्यांच्या डोक्यात शिरला. चूक त्यांची नाही तर आमची आहे. जो तो त्याचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला ही तेच करावे लागेल. म्हणूनच महाराष्ट्रभर फिरून जनतेत जाऊन मते आजमावत आहे. आम्हाला भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सारखेच आहेत. काँग्रेसने त्या त्याकाळात बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये प्रादेशिक पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केलाच होता. आता भाजपही तेच करत आहे. त्यामुळे दोघांपासून समान अंतरावर राहून आमचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.

जानकर म्हणाले, एकेकाळी महायुतीचे घटक पक्ष असलेले जानकर यांनी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीला बोलावले नसल्याची नाराजी व्यक्त करत नव्याने झालेला इंडिया आघाडी आम्हाला गृहित धरत नाही, अशी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष हा गद्दार आहे तर भाजप हा पक्ष महागद्दार आहे. हे सत्तेत येत नव्हते, तेव्हा त्यांना जी दीड दोन टक्के मतांची गरज होती. आमच्याशी युती करून ती दीड दोन टक्के मते मिळवून सत्ता हस्तगत केली. त्यानंतर मात्र सत्तेचा घमंड त्यांच्या डोक्यात शिरला. चूक त्यांची नाही तर आमची आहे. जो तो त्याचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला ही तेच करावे लागेल. म्हणूनच महाराष्ट्रभर फिरून जनतेत जाऊन मते आजमावत आहे. आम्हाला भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सारखेच आहेत. काँग्रेसने त्या त्याकाळात बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये प्रादेशिक पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केलाच होता. आता भाजपही तेच करत आहे. त्यामुळे दोघांपासून समान अंतरावर राहून आमचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. (Latest Marathi News)

महादेव जानकर म्हणाले, आता गोपीनाथ मुंडेचा भाजप राहिलेला नाही. सध्याचा भाजप देवेंद्र फडणवीसांचा झाला आहे. आम्ही गोपीनाथ मुंडेसाहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपशी युती केली होती. मात्र सध्या कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवून युती करावी, असे नेतृत्व ना काँग्रेसकडे, ना भाजपकडे त्यामुळे आम्ही कोणासोबत जायचे याचा निर्णय त्या - त्यावेळी आमच्या पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड घेईल. सध्याच्या भाजपच्या या धोरणामुळे भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही.

ते म्हणाले, आता कुणाच्या मागे लागायचे नाही. ज्यांना गरज असेल ते आपल्या मागे लागतील. आपण रस्त्यावरची फाटकी माणसं आहोत. पक्ष वाढवायचा असेल तर मतांची टक्केवारीपण वाढली पाहिजे. त्यासाठी रासप आपला प्रत्येक निवडणूकीत उमेदवार उभा करणार आहे. लोकसभा व संसद हे माझे प्राधान्य आहे. मागच्यावेळी आमची युती होती. पक्षातील लोकांचा आग्रह होता. त्यामुळे विधानपरिषद आणि मंत्रीपद घेतले. आता आपल्यासाठी बारामती, परभणी, माढा मतदारसंघ तसेच उत्तरप्रदेशमधील मिर्झापूर असे मतदारसंघाचे पर्याय खुले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT