Mahadev Betting App Saam Digital
महाराष्ट्र

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅपचं बीड कनेक्शन? पाहा स्पेशल रिपोर्ट

Mahadev Betting App Beed Case: भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सांगत आरोपांची राळ उडवून दिली आहे.

Dhanshri Shintre

मस्साजोग प्रकरणानंतर सुरेश धस यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेत महादेव बेटिंग अ‍ॅपच्या बीड कनेक्शनबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. नेमकं महादेव बेटिंग अ‍ॅपचं बीड कनेक्शन कसं आहे?

भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सांगत आरोपांची राळ उडवून दिली आहे. या आधी कायदा सुव्यवस्था, त्यानंतर बोगस पीक विमा घोटाळा यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यातच आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेत धस यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर सुरेश धस चांगलेच आक्रमक झालेत. तर त्यांनी बीडमधील गुन्हेगारीमागे आका असल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर धस यांनी बीडच्या आकाच्या गैरव्यवहाराची यादीच वाचून दाखवली आहे.

बीडमधील 'आका'च्या बगलबच्चांकडून 1400 एकर जमिनीवर ताबा

शिरसाळा गावात गायरान जमिनीवरील 600 पैकी 300 वीटभट्ट्या अनधिकृत

वीटभट्ट्या आकाच्या कार्यकर्त्यांच्या असल्याचा धस यांचा दावा

आका चे कार्यकर्ते दुसऱ्यांच्या 40 ते 50 एकरवर मुरुम टाकतात

आकाच्या कार्यकर्त्यांनी बोगदा बुजवला

बीड जिल्ह्यात गँग्ज ऑफ वासेपूर सक्रीय असल्याचा आरोप

बीडमधील आर्थिक गैरव्यवहाराची ईडीमार्फत चौकशीची मागणी

सुरेश धस हे धनंजय मुंडेंवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आरोप करत आहेत. एवढंच नाही तर सुरेश धस धनंजय मुंडेंच्या खासगी जीवनावरही बोलू लागलेत. त्यामुळे मस्साजोग प्रकरणाचा वापर वैयक्तिक राजकारणासाठी सुरू आहे का? अशीही चर्चा राज्यात रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

SCROLL FOR NEXT