Maharashtra Assembly Election 2024  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पुण्यात मविआला मोठा धक्का, माजी आमदाराने अपक्षाला दिला पाठिंबा

Maharashtra Vidhan Sabha Election : पुण्यात मविआला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाबर यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलाय.

Namdeo Kumbhar

सागर आव्हड, साम टीव्ही प्रतिनिधी

Hadapsar Assembly Constituency Election : पुण्यातील हडपसर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतदानाला दोन दिवस असतानाचा महादेव बाबर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मविआला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. महादेव बाबर यांनी पत्रकार परिषद घेत बधे यांना पाठिंबा जाहीर केला. अपक्ष उमेदवार गंगाधर बधे हेच महादेव बाबर म्हणून मतदान करा, असे आवाहन बाबर यांनी केले.

हडपसर मतदार संघात अपक्ष गंगाधर बधे हेच शक्तिमान

हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांची दिवसेंदिवस ताकद वाढत आहे. मतदारसंघांमध्ये मला मानणारा शिवसैनिक व मतदार वर्ग मोठा आहे. मी केलेली विकास कामे आणि मतदारांसोबत माझा मोठा संपर्क आहे. अनेक वर्षापासून मतदार संघामध्ये नागरिकांच्या प्रश्नासाठी केलेले आंदोलन यामुळे सार्वजनिक हितांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला. त्यासोबत गंगाधर बधे यांनी सुद्धा शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहून अनेक नागरिकांच्या मदतीला धावून प्रश्न सोडवण्याचे काम केले. आम्ही दोघेही शिवसैनिक आहोत. त्यामुळे गंगाधर हेच महादेव आहेत आणि गंगाधर हेच शक्तिमान आहेत. त्यामुळे मतदारांनी गंगाधर बधे यांना महादेव बाबर समजूनच मोठ्या बहुसंख्येने मतदान करावे, असे माजी आमदार महादेव बाबर यांनी मतदारांना आवाहन केले.

महादेव बाबर काय म्हणाले ?

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार महादेव बाबर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबर बोलत होते. याप्रसंगी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत महादेव बाबर यांनी सांगितले, हडपसर मतदारसंघामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याकरता आम्ही शिवसेना गंगाधर बधे यांना अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उभे केले आहे. मतदारसंघांमध्ये मी आमदार असतानाच महत्त्वाचे जे प्रश्न आहेत मांजरी जाण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल करणे, त्यासोबत मांजरी महादेव नगर परिसरामध्ये पाणीटंचाई दूर व्हावी याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेची पेयजल योजना पाठपुरावा करून मंजूर करून आणून ठेवली होती, असे बाबर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nayanthara : ३ सेकंदाच्या क्लिपसाठी धनुष्य अन् नयनतारा यांचा वाद कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Updates: राज्यभरात आज प्रचाराचा सुपर संडे

Shani Gochar: शनी मिथून राशीत मार्गी; या ३ राशींसाठी शनीची सरळ चाल देणार मोठे लाभ!

Super Star Pavan Kalyan News : आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री सुपरस्टार पवन कल्याण यांचं मराठीतून जोरदार भाषण | VIDEO

Washim Accident: एसटी बस -दुचाकीची समोरासमोर धडक, २ जण ठार

SCROLL FOR NEXT