Mahad News Saam TV
महाराष्ट्र

Mahad News : १५० फूट दरीत कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

शिगवण यांचा पाय घसरला आणि ते दिडशे फूट खोल असलेल्या दरीत कोसळले.

साम टिव्ही ब्युरो

महाड (Mahad) येथील चांभार खिंड गावात एक दुर्घना घडली आहे. शेतीलगत असलेल्या बांधाला वणवा लागल्याने तो विझवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना रविवारी (२७ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. विकास शिगवण (वय ५२ वर्ष) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, विकास शिगवण यांची चांभार खिंड गावात डोंगर (Mountain) भागात शेती आहे. रविवारी अचानक त्यांच्या शेतीलगत असलेल्या बांधावर वणवा लागला. याची माहिती मिळताच, शिगवण यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. वणवा विझवला नाही तर हातातोंडाशी आलेले पिक जळून खाक होईल अशी त्यांना भीती होती.

मात्र आग विझवत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. शिगवण यांचा पाय घसरला आणि ते दिडशे फूट खोल असलेल्या दरीत कोसळले. यात त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तात्काळ त्यांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी विकास शिगवण यांचा मृत्यू झाला. याबाबत महाड शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

खेडमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

खेडमध्ये एका तरुणाने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नीबरोबर वाद झाल्याने नैराश्यात येऊन तरुणाने स्वत:चे जीवन संपवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय सानप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

खेडमधील राजगुरुनगर येथे तो पत्नीसह राहत होता. त्याची पत्नी भुमापक विभागत कार्यरत आहे. अजय देखील तिथेच नोकरी करत होता. या दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. अशात या वादाला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेतला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratangad Fort History: सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रतनगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Dasara Melava Live Update : भाषणादरम्यान कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पंकजा मुंडे भडकल्या

Face Care: दररोज फेस पावडर लावण्याची सवय आहे, मग चेहऱ्याला होऊ शकतात 'हे' स्किन प्रॉब्लेम्स

Prajakta Mali: जांभळ्या साडीत प्राजक्ताचं मराठमोळ सौंदर्य...

Jalgaon : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा तलावात बुडून मृत्यू; जळगावच्या मेहरूण तलावातील घटना

SCROLL FOR NEXT