Raigad News Saam TV
महाराष्ट्र

Raigad News: मित्रांसोबत पार्टी करताना तरुणावर काळाचा घाला; महाड MIDC परिसरातील खळबळजनक घटना

Accident News: आपल्यासोबत हसतखेळत, मजेत पार्टी करत असलेला आपला मित्र आता आपल्यात नाही. हे ऐकूण त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र

Ruchika Jadhav

सचिन कदम

Mahad MIDC:

गुरुवारी संध्याकाळी मित्रांसोबत पार्टी करत असताना महाड MIDC मध्ये 25 वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. शंभू डीगर असं या मृत तरुणाचं नाव आहे. तो पश्चिम बंगालचा रहिवासी असून सदर घटनेनं परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तरुण कामानिमित्त आपल्या भावासोबत महाड MIDC मध्ये वास्तव्यास होता. पगार झाला म्हणून त्याने आपल्या मित्रांसह पार्टी केली. तो आणि चार मित्र पार्टी करत असताना शंभूने टेबलावर अचानक मान टाकली.

त्याला नेमकं काय होतंय, काय झालंय? असे अनेक प्रश्न मित्रांच्या मनात येत होते. त्यांनी तातडीने शंभूला महाड MIDC तील MMA हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच शंभूचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषित केले.

आता आपल्यासोबत हसतखेळत, मजेत पार्टी करत असलेला आपला मित्र आता आपल्यात नाही. हे ऐकूण त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर आलेल्या अहवालात हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद महाड MIDC पोलिस ठाण्यात करण्यात आली असून MIDC पोलिस अधिक तपास करीत आहेत. मृत्यू कधी आणि कसा ओढावेल काही सांगता येत नाही. या आधी देखील हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT