mahableshwar businessman 
महाराष्ट्र

अनलाॅक जाहीर करण्याची घाई जिल्हाधिकाऱ्यांनी का केली?

साम न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर (जि. सातारा) : जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे महाबळेश्वरच्या (mahableshwar) बाजारपेठेतील व्यापारी संतप्त झालेत. या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. विविध सोहळयांत गर्दी झाली तर कोरोना (coronavirus) पसरत नाही. परंतु, दुकानात पर्यटक (tourist) आले की कोरोनाचा फैलाव होतो, असे जिल्हाधिकाऱ्यांना सिध्द करायचे आहे का असा संतप्त सवाल या व्यापारी यांनी केला आहे. (mahableshwar-traders-demands-shekhar-sinh-to-unlock-satara-marathi-news)

अनेक दिवसांच्या लाॅकडाउननंतर महाबळेश्वर पर्यटकांसाठी (mahableshwar tourism) खुले करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या निर्णयानंतर पर्यटक शहरात येऊ लागले हाेते. लहान- मोठ्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळू लागला होता. जिल्हयातील कोरोना रूग्णवाढीचा दर हा सात ते नऊ टक्क्यांच्या या दरम्यान स्थिरावला. अनेक प्रयत्न करूनही तो खाली येत नसल्याचे पाहुन जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लाॅकडाउनचा निर्णय घेतला. शनिवार- रविवार विकेंडनंतर उद्या सोमवार (ता.5) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे व्यापारी व इतर व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कोरोना रूग्णवाढीचा दर खाली येत नव्हता, तर मग अनलाॅक जाहीर करण्याची घाई जिल्हाधिकाऱ्यांनी का केली? अधिकाऱ्यांत सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी व नागरीकांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे.

डॉ. साबने रोडवरील व्यापारी ॲड. संजय जंगम व अतुल सलागरे यांनी व्यापारी बांधवाची बाजू मांडली. ते म्हणाले ‘‘जिल्हाधिकाऱ्यांनी लाॅकडाउनचा निर्णय घेत व्यापाऱ्यांना वेठीस धरले आहे. जिल्हयात सर्वत्र चोरून व्यवसाय केला जात आहे. परंतु, शासनाचे कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे कोटेकोरपणे पालन करणारे महाबळेश्वरमधील व्यापारी मात्र गुन्हेगार ठरत आहेत. शासनाने सांगितल्याप्रमाणे आम्ही कोरोना तपासण्या केल्या. कोरोना लसीचे दोन डोस घेतले. मास्कचा वापर करून आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहे. तरीही प्रशासन आम्हाला वेठीस धरत आहे.’’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT