Mahabeej Seed x
महाराष्ट्र

Mahabeej Seed Scam : खरिपाच्या तोंडावर बियाणं घोटाळा, कृषी खातंच करतंय शेतकऱ्यांची फसवणूक? महाबीज लावलंय शेतकऱ्यांना चूना

खरिप हंगाम तोंडावर असतानाच बळीराजाच्या फसवणूकीला सुरुवात झालीय आणि ही फसवणूक चक्कं सरकारी कंपनीकडूनच सुरुय... मात्र हा घोटाळा काय आहे? त्यात शेतकऱ्यांची फसवणूक कशी केली जातेय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

अमरावती : मान्सूनने लवकर हजेरी लावल्याने बळीराजा खरिपाच्या पेरणीसाठी बियाण्यांची जुळवाजुळव करायला लागला, मात्र सरकारने 100 टक्के अनुदानावर हेक्टरी 75 किलो बियाणं देण्याचं जाहीर केलं.. महाबीजकडून प्रत्यक्षात 66 किलोच बियाणं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक सुरु असल्याची धक्कादायक बाब उघड झालीय...

एकीकडे सरकार हेक्टरी 75 किलो बियाण्याची घोषणा करतंय.. त्यानुसार महा डीबीटीच्या लॉटरीनुसार शेतकऱ्यांना महाबीजचं बियाणं देण्यात येत आहे.. मात्र महाबीजकडून 22 किलोंची एक बॅग या प्रमाणे 66 किलोच बियाणं देत आहे.. त्यामुळे महाबीज प्रति हेक्टर 9 किलोंवर डल्ला मारत असल्याचं समोर आलंय..

राज्यात बियाणं घोटाळा?

- शेतकऱ्याला 75 किलो बियाणे मोफत देण्याची योजना

- महाबीजकडून 22 किलो बियाण्याच्या 3 बॅगचं वाटप

- 75 किलो ऐवजी शेतकऱ्यांच्या वाट्याला प्रत्यक्षात 66 किलोच बियाणं

- शेतकऱ्याला हेक्टरी 9 किलो बियाण्याचा तोटा

तर साम टीव्हीने हा धक्कादायक प्रकार समोर आणला.. त्यानंतर अमरावती कृषि विभागानं सारवासारव करत घोटाळ्यावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केलाय... तर दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिलेत...

एकीकडे सरकार 75 किलो प्रति हेक्टर या प्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या बियाण्याची बेरीज करेल.. तर बळीराजाच्या पदरात 9 किलो कमी बियाणं पडेल.. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीनंतर शेतकऱ्यांना हक्काचं 75 किलो बियाणं देण्यात येणार की महाबीजनंतर सरकारही बळीराजाची फसवणूकच करणार? याकडे राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT