election commission of india google
महाराष्ट्र

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Mahavikas Aaghadi Allegation On Devang Dave: मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं पुन्हा एकदा केला...मात्र यावेळी निवडणुक आयोगाचं सर्व्हर आणि वेबसाईट नेमकं कोण चालवतयं? असा सवाल उपस्थित करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीच टीका केलीय... नेमकं प्रकरण काय आहे? देवांग दवे कोण आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं सलग दुसऱ्या दिवशी निवडणुक आयोगाची भेट घेतली.त्यातच निवडणूक आयोगाच्या सर्व्हरच्या सुरक्षिततेबद्दल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. आयोगाचा सर्व्हर दुसरं कुणीतरी बाहेरून ऑपरेट करत असल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय.तर भाजपचे पदाधिकारी असलेले देवांग दवे हे आयोगाची वेबसाईट हाताळतात, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केलाय.

मात्र विरोधकांनी ज्या देवांग दवेंवर आरोप केलाय.... ते देवांग दवे नेमके कोण आहेत?... पाहूयात...

देवांग दवे कोण आहे?

देवांग दवे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक

राजकीय रणनीतीकार म्हणून ओळख

वयाच्या 19 व्या वर्षी मोदींसाठी स्वयंसेवक म्हणून काम

दवेंनी आय सपोर्ट नरेंद्र मोदी डिजिटल मोहीम राबवली

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची जाहिरात मोहीम सांभाळली

जून 2025 मध्ये मुंबईतील कांदिवली पूर्वमधल्या जानुपाडा परिसरात देवांग दवे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली. दवे आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्या समर्थकांमधील वाद इतका वाढला की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. ज्यामुळे भाजपातील अंतर्गत गटबाजी समोर आली होती.त्यातच आता विरोधकांनी देवांग दवेंवर निशाणा साधल्यानं पक्षश्रेष्ठी आणि निवडणुक आयोग विरोधकांच्या या आरोपाला काय उत्तर देत? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Election Commission : नाव नव्हे तर गावचं मतदार यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा अजब कारभार

SCROLL FOR NEXT