Pankaja Munde Uddhav Thackeray Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha: बीडमध्ये पंकजा मुंडेंना महाविकास आघाडी देणार तगडं आव्हान; नेमका प्लान काय आहे?

Beed Lok Sabha Election News: पंकजा मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

विनोद जिरे

Pankaja Munde vs Mahavikas Aaghadi

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून भाजपने आपल्या उमेदवारांच्या पहिल्या दोन यादी जाहीर केल्या आहेत. या यादीत पंकजा मुंडे यांचं नाव असून त्यांना बीड लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, पंकजा मुंडेंविरोधात (Pankaja Munde) तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीने प्लान आखला आहे. आज महाविकास आघाडीची बैठक होणार असून या बैठकीत उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. बीडच्या जागेवर मविआकडून राष्ट्रवादी शरद पवार गट दावा करत आहे. (Latest Marathi News)

शरद पवार गटात इच्छुकांची संख्या जास्त असली तरी मोजक्याच लोकांशी चर्चा केली जात असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. २०१९ मध्ये या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली होती. त्यामुळे या निवडणुकीतही (Lok Sabha Election 2024) जागा आपल्यालाच मिळावी, अशी मागणी शरद पवार गटाचे कार्यकर्ते करीत आहेत.

त्यामुळेच आज खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बीडचा उमेदवार ठरविण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. आता यात कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते ? याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शरद पवार गटाकडून डॉ. नरेंद्र काळे, प्रा. ईश्वर मुंडे, सुशीला मोराळे, रविकांत राठोड हे इच्छूक आहेत. तर डॉ. अशोक थोरात, डॉ. ज्योती विनायकराव मेटे, बजरंग सोनवणे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

Edited by - Satish Daud-Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरात अल्पवयीन तरुणाकडून वाहनांची तोडफोड

Wardha News: धक्कादायक! बेशुद्ध रुग्णच्या अंगावर चढल्या मुंग्या, हिंगणघाटच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार

Malaria: 'ही' लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध, असू शकतो मलेरिया

Sangli : १ कोटी ४० लाखांची थकबाकी! जलजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदारानं आयुष्य संपवलं, पैसे न मिळाल्यानं उचललं टोकाचं पाऊल

Plane Crash: आणखी एक Plane Crash; महामार्गावर धावणाऱ्या वाहनांवर कोसळलं विमान

SCROLL FOR NEXT