NEET UG Exam Canceled Saam tv
महाराष्ट्र

NEET UG Exam: नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोट सापडली

NEET UG Exam Canceled: नीट परीक्षेच्या पेपर फुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली. नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे गोव्यामध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. राहत्या घरात गळफास घेत त्याने आयुष्य संपवलं.

Priya More

Summary:

  • नीट परीक्षेच्या पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द

  • परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

  • राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं

नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोव्यामध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने नीटची परीक्षा दिली होती. त्याला पेपरही चांगला गेला होता. पण अचानक नीटची परीक्षा रद्द झाल्याचे कळताच हा विद्यार्थी चिंतेत आला. त्याने राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे गोळ्यात खळबळ उडाली आहे. पोलिल सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील कुडतरी येथे ही घटना घडली. नीट परीक्षा रद्द झाल्याचे ऐकून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. परीक्षआ रद्द झाल्याचा धसका घेऊन या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले. मंगळवारी रात्री राहत्या घरामध्ये त्याने गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहील होती. ही सुसाईड नोट पोलिसांना सापडली. आपल्याला यापुढे स्पर्धात्मक परीक्षेत बसायचे नाही. मी आयुष्य संपवत असल्याचे त्याने सुसाइड नोटमध्ये लिहिले.

पोलिसांनी सांगितले की, मडगावातील एका उच्च माध्यमिक विद्यालायात हा विद्यार्थी शिकत होता. हा विद्यार्थी मूळचा कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील होता. त्याचे वडील रेल्वेत गार्ड म्हणून कामाला आहेत. तो कुटुंबीयांसोबत गोव्यात राहत होता. त्याची आई आणि बहीण मूळ गावी गेल्या होत्या. घरात कुणी नसताना त्याने गळफास घेत आत्महत्या केली.

या विद्यार्थ्याचे वडील बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर त्यांना आपला मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. घरातील चित्र पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी विद्यार्थ्याच्या मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कारवर पहाटे हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Chanakya Niti: या 5 क्वालिटी तुम्हाला बनवतील बॉस, वाचा चाणक्यांनी दिलेल्या खास टिप्स

Kitchen Hacks : तुम्ही खरेदी केलेले लसूण रासायनिक की नैसर्गिक; 'या' ५ पद्धतीने ओळखा

Face Care: चेहरा नॅचरल ग्लोईंग आणि सॉफ्ट चेहऱ्यासाठी रोज सकाळी एका चमचा हे गोड पेय नक्की प्या

Maharashtra News Live Update: पुण्यात NEET पेपर फुटी प्रकरणी पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT