Chandra Grahan 2022
Chandra Grahan 2022  Saam Tv
महाराष्ट्र

वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण, कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: वर्षातील पहिलं सूर्यग्रहण नुकतंच झालं आहे. त्याच्या काही दिवसामध्येच यावर्षीचं पहिलं चंद्रग्रहण (Lunar eclipse) देखील आज आहे. हे एक खग्रास चंद्रग्रहण राहणार आहे. भारतीय (Indian) प्रमाणवेळेनुसार हे ग्रहण सकाळी ८ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होणार आहे. तर १० वाजून २३ मिनिटांपर्यंत त्याचा प्रभाव दिसणार आहे. अवघ्या १५-१६ दिवसांतच दुसरे ग्रहण असल्याने खगोल अभ्यासकांसाठी ही महत्वाची ठरणार आहे. यंदाचे पहिलं सूर्यग्रहण (Solar eclipse) ३० एप्रिल २०२२ या दिवशी झाले होते. हे ग्रहण भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्रीच्या वेळी झाले होते. यामुळे भारतात ते बघायला मिळाले नाही. त्याचप्रमाणे आगामी चंद्रग्रहण देखील भारतीय वेळेनुसार दिवसा होणार असल्याने ते भारतातून बघता येणार नाही.

कुठे-कुठे बघता येणार?

हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी घडणार असल्याने हे भारतातून बघता येणार नाही. २०२२ मधील पहिले चंद्रग्रहण हिंद महासागर क्षेत्रात अंशतः दिसू शकणार आहे. तर प्रशांत महासागर, अटलांटिक, अंटार्क्टीका, दक्षिण आणि पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका (Africa) खंडात काही भागामध्ये दिसू शकणार आहे. साधारण हे ग्रहण २ प्रकारचे आहे. तांत्रिकदृष्ट्या २ ताऱ्यांचा समावेश असलेला १ तिसरा ग्रहण- प्रकार होत असल्याचे खगोलशास्त्रज्ञ जुआन काल्रोस बि्यामिन यांनी त्यांच्या इलुस्ट्रेटेड अॅस्ट्रोनॉमी या पुस्तकामध्ये लिहिले आहे.

हे देखील पाहा-

जुआन यांच्या पुस्तकात देण्यात आलेले ग्रहणांचे प्रकार -

पृथ्वी (Earth) स्वतःभोवती प्रदक्षिणा घेत-घेत स्वतः सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते, तर चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. यादरम्यान, चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यात आल्यानवर जी स्थिती निर्माण होत असते, त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. तर, सूर्य आणि चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यावर निर्माण होणाऱ्या स्थितीला चंद्रग्रहण असे म्हटले जाते.

ग्रहण कोणतेही असो त्याचे ३ प्रकार आहेत. खग्रास ग्रहण, कंकणाकृती ग्रहण आणि खंडग्रास ग्रहण हे ग्रहणाचे ३ प्रकार आहेत. यामध्ये किती प्रमाणात चंद्र किंवा सूर्य झाकोळले जात असते, किती प्रमाणात त्यांची सावली एकमेकांवर दिसून येत असते, यावर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो. सूर्यग्रहण खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती अशा ३ प्रकारचे आहे. तर चंद्रग्रहणाचे खग्रास, खंडग्रास आणि उपछाया असे ३ प्रकार असतात. या ग्रहणांची आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.

खग्रास चंद्रग्रहण

नासाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे सरळ एका रेषेत आल्यावर खग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होत असते. यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली येत असतो. पण तरी देखील काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत असतो. यावेळी चंद्राचा हा भाग थोडा लालसर दिसायला लागतो. याला ब्लड मून असे म्हटले जाते. सूर्य आणि चंद्रग्रहणामध्ये फरक काय असा प्रश्न आपल्याला पडला आहे. याचे उत्तर म्हणजे सूर्यग्रहण पृथ्वीवर विशिष्ट भागातून बघता येऊ शकते. पण चंद्रग्रहण काही प्रमाणात जगभरातून बघायला मिळू शकतो. ८ नोव्हेंबर २०२२ ला खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, जे भारतातून नीट दिसणार आहे.

खंडग्रास चंद्रग्रहण

चंद्राचा फक्त काही पृष्टभाग हा पृथ्वीच्या सावलीखाली आल्यावर खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होत असते. ही सावली किती मोठी आहे, तितका याचा प्रभाव दिसून येत असतो. यावेळी चंद्राच्या इतर भागांवर देखील गडद लालसर किंवा चॉकलेटी रंगछटा दिसण्याची शक्यता असते. उघडा भाग आणि सावलीखालील भाग याचे मिश्र स्वरुप तयार होऊन चंद्रावर अनेक रंगछटा दिसून येत असतात. खग्रास चंद्रग्रहण दुर्मिळ असून २ वर्षांच्या अंतराने ते दिसू शकणार आहेत. मात्र, खंडग्रास चंद्रग्रहण वर्षातून २ वेळा दिसू शकणार आहे. आगामी खंडग्रास चंद्रग्रहण १८-१९ नोव्हेंबर २०२१ दिवशी दिसणार आहे. उत्तर-दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, काही प्रमाणात युरोप आणि आशिया खंडांमध्ये ते बघितले जाऊ शकणार आहे.

छायाकल्प चंद्रग्रहण

या ग्रहणप्रकारात पृथ्वीची किंचित सावली चंद्रावर पडली असते. ती अतिशय पुसट असू शकणार आहे. मानवी डोळ्यांना ते चटकन लक्षात येईल इतके प्रभावी नसणार आहे. अतिशय छोट्या स्वरूपाचे हे ग्रहण असणार आहे. कधी- कधी तर असे चंद्रग्रहण कॅलेंडरमध्ये नोंदवले देखील नसतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

SCROLL FOR NEXT