Lumpy Skin Disease News: लम्पी आजाराने पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. नाशिकमधील सिन्नर तालूक्यात लम्पी (Lumpy Skin Disease) आजाराचा कहर सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: हवालदिल झाला आहे. नाशिक शहरात लम्पीच्या संसर्गामुळे १०० हून अधिक जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. (Nashik Latest News)
नाशिकमध्ये (Nashik) लम्पीचा प्रदुर्भाव सर्वाधिक आहे. इथे गेल्या २२ दिवसांत १७२ जनावरे बाधित झाली आहेत. त्यातील ११ जनावरांचा मृत्यू झाला असून, १२० जनावरांवर उपचार सुरू आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत हा वेग जास्त आहे. लसीकरण १०० टक्के झाले असून देखील मृत जनावरांच्या आणि बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने पशुधन विकास विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
लम्पी आजाराने दोन महिन्यांपूर्वी मोठा धुमाकूळ घातला होता. यात अनेक जनावरांचा बळी देखील गेला. अशात यावर उपाययोजना म्हणून सरकारने लसीकरणाला सुरुवात केली. आता जवळपास १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र तरी देखील नाशिकमध्ये लम्पी आजार वाढताना दिसतो आहे. (Maharashtra News)
सरकारमार्फत एकूण ८६ हजार ९०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. लसीकरण झाल्यानंतर जनावरांमध्ये या आजाराचा प्रदुर्भाव आटोक्यात आला होता. मात्र या महिन्यात दुपटीने लम्पीचा संसर्ग वाढलेला दिसत आहे. १०० टक्के लसीकरणानंतरही मृत जनावरांची संख्या अडीच पटीने वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.