Palghar Crime samm tv
महाराष्ट्र

Palghar Crime: प्रेमसंबंधातून हत्या! नवऱ्याला सोबत घेतलं, अन् प्रेयसीनं बॉयफ्रेंडचा काटा काढला

Palghar Crime Case Love Triangle Ends in Tragedy: प्रेमसंबंधातून नवऱ्यालासोबत घेऊन प्रेयसीने आपल्या बॉयफ्रेंडचा काढला. ही धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जामसर गावात घडली.

Bhagyashree Kamble

फय्याज शेख, साम टीव्ही

प्रेमसंबंधातून नवऱ्यालासोबत घेऊन प्रेयसीने आपल्या बॉयफ्रेंडचा काढला आहे. ही धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जामसर गावात घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपी प्रेयसी आणि तिच्या नवऱ्याला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात प्रेमसंबंधाच्या पार्श्वभूमीवर तरूणाची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत तरूणाचे नाव सोमनाथ दिघे असे होते. तो ३० वर्षांचा होता. तर, मालवंती दिघे आणि दीपक दिघे असे दोन्ही आरोपींचे नाव आहे. २ दिवसांपूर्वी कामावरून परतत असताना रस्त्यात त्याची प्रेयसी दिसली. प्रेयसी भेटल्यानंतर मागून तिचा नवरा आला. दोघांनी मिळून त्यांनी सोमनाथवर धारदार शस्त्राने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रेमसंबंधातून संशय त्यातून कट

तरूणाची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तातडने घटनास्थळ गाठले. तसेच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलीस तपासात समोर आलं की, मालवंती आणि सोमनाथ या दोघांचं लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होतं. मात्र, त्यानंतर मालवंती आणि दीपकचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतरही दोघांमधील संबंध कायम होते. यामुळे दीपकला वारंवार संशय येत होता.

दीपक आणि मालवंतीमध्ये कायम भांडणं होत. अखेर मालवंतीच्या मदतीने दीपकने सोमनाथला संपवण्याचा कट रचला आणि अंमलात आणला. दीपकने धारदार शस्त्राने वार करत सोमनाथला संपवलं. या हत्येनंतर जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी तपास करत दोघांना अटक करत त्यांची चौकशी केली. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबूली दिली. सध्या दोघे आरोपी कोठडीत असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT