Hingoli Crime News Saam Tv News
महाराष्ट्र

Hingoli Crime: प्रेमाने घात केला, वादाने टोक गाठलं; बॉयफ्रेंडने घरातच गर्लफ्रेंडला संपवलं, परिसरात खळबळ

Hingoli Crime News: हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील वगरवाडी गावात प्रेमप्रकरणातून एका तरूणीची हत्या केल्याची माहिती उघडकीस आलीय. रिलेशनशिपमध्ये झालेल्या वादातून प्रियकर आरोपीनं तरूणीची हत्या केली.

Bhagyashree Kamble

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील वगरवाडी गावात प्रेमप्रकरणातून एका तरूणीची हत्या केल्याची माहिती उघडकीस आलीय. रिलेशनशिपमध्ये झालेल्या वादातून प्रियकर आरोपीनं तरूणीची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह जंगलात फेकला. हत्या केल्यानंतर तरूणीची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचण निर्माण होत होती. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत.

प्रेम प्रकरणात कोण कधी टोकाचं पाऊल उचलेल सांगता येत नाही. अशीच एक विचित्र घटना हिंगोलीमध्ये घडली. या प्रकरणानंतर, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, तरूणीच्या प्रियकराला अटक करण्यात आलं आहे. हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील वगरवाडी शिवारात २९ वर्षीय तरूणीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकल्याची माहिती आहे. तरूणीची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली आणि गुन्ह्याची नोंद केली.

तरूणीची हत्या केल्यानं तिची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचण येत होती. मात्र, पाच दिवसानंतर मृत तरुणीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. मृत तरूणी नगर जिल्ह्यातील जामखेडमधील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृत तरूणीचे नाव अलका बाजीराव बेंद्रे असून, या तरूणीची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती पोलीस तपासातून निष्पन्न झालं आहे.

आरोपी श्रीकांत सुरेश पिनलवार आणि मृत तरूणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. रिलेशनशिपमध्ये सतत वाद होत असल्यानं आरोपीने छत्रपती संभाजीनगर येथील लाडगावमधील भाडयाच्या रूमध्ये तरूणीचा गळा आवळून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं मृतदेह जंगलामध्ये टाकला. नंतर आरोपी आदिलाबादला गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शोध घेत आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT