shirdi loudspeaker, Shirdi Kakad Aarti News, Shirdi latest news updates Saam Tv
महाराष्ट्र

दुसऱ्या दिवशीही साईंची काकड आरती भोंग्याविना; सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत परवानगी, भक्तांमध्ये नाराजी

साईबाबांची होणारी पहाटेची काकड आरती आणि रात्रीची शेजारती दुसऱ्या दिवशीही भोंग्याविना पार पडली.

गोविंद साळुंके

शिर्डी: साईबाबांची होणारी पहाटेची काकड आरती आणि रात्रीची शेजाआरती दुसऱ्या दिवशीही भोंग्या (Loudspeaker) विना पार पडली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अल्टिमेटमनंतर राज्यातील सगळ्या धार्मिकस्थळांना पोलिसांनी (police) नोटिसा दिल्या आहेत. याचा फटका शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरालाही (temple) बसला आहे. साईबाबांची होणारी पहाटे ५ वाजताची काकडी आरती आणि रात्री १०.३० होणारी शेजाआरती आता भोंग्याविना होणार आहे. पोलिसांनी सकाळी ६ ते रात्री १० वाजता भोंग्याला परवानगी दिली असल्याने, भोंग्याविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये काहीशी नाराजी आहे. (Shirdi latest news updates)

हे देखील पाहा-

दरम्यान सकाळी काकड आरतीच्या वेळी भोंगा बंद असल्याने अनेक भक्तांना आरती सुरू झाली की नाही? हा संभ्रम होत होता. मात्र, यावेळी काशी येथून आलेल्या एका भक्ताने आपल्या जवळील मोबाईलवर काकड आरती सुरू केली. दरम्यान, मंदिरात जाऊ न शकणाऱ्या भक्तांनी द्वारकामाई परिसरात मोबाईलच्या आवाजवरच साईंची काकड आरती करण्यात आली आहे.

दरम्यान ३ मे ला शिर्डी पोलीसांनी साईबाबा संस्थानला पत्राद्वारे सर्वोच्च न्यायलयाच्या (Supreme Court) आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत भोंगा वापरण्यास परवानगी नसल्याने साईमंदीरावरील लाऊडस्पीकर वापरु नये, असे आदेश दिल्याने ३ मे या दिवशी रात्री साईमंदीरात करण्यात आलेली शेजारती आणि ४ मे या दिवशी पहाटेची काकड आरती भोंग्यावरुन प्रसारीत करण्यात आली नाही. दरम्यान कोर्टाच्या आदेशाचे पालन साईमंदीरात पालन केले जाणार असल्याच साई संस्थानच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याविषयी आवाज उठविल्यावर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. कुर्ला येथील एससीएलआर जवळील विभागात ३ ते ४ मोठ्या मशिदी आहेत. यामुळे इथे पहाटे ६ च्या अगोदर मोठ्या आवाजात अजान होत असते. मात्र, आज या विभागात नमाज पठण झाले. पण लाउडस्पीकरवर अजाण झाली नाही. दरम्यान, मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT