Lonavala News Saam tv
महाराष्ट्र

Lonavala News : लोणावळ्यात गुटखा विक्री; पोलिसांची पाच टपरी धारकावर कारवाई

Lonavala News : लोणावळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणत गर्दी असते. सुट्यांमध्ये पर्यटकांची गर्दी अधिक वाढत असते. मात्र याच ठिकाणी विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याची विक्री केली जात असते

दिलीप कांबळे


मावळ
: पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जात आहे. ही माहिती लोणावळा पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. यानंतर कारवाई करण्याचे आदेश दिले असता पोलिसांकडून तपासणी करत पाच टपरी धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. 

लोणावळ्यात (Lonavala News) पर्यटकांची मोठ्या प्रमाणत गर्दी असते. सुट्यांमध्ये पर्यटकांची गर्दी अधिक वाढत असते. मात्र याच ठिकाणी विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याची विक्री केली जात असते. याबाबत लोणावळ्याचे पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली असता त्यांनी  लगेच एक टीम तयार करून लोणावळ्यातील सर्व टपरी धारकांची तपासणी करत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांची टीमकडून तपासणी मोहीम राबविण्यात आली. 

बारा जणांना घेतले ताब्यात 

पोलिसांनी (Lonavala Police) केलेल्या तपासणीत पाच टपऱ्यांमध्ये गुटखा आढळून आला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून अंदाजे एक लाख आठ हजार ७७२ रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला आहे. या कारवाईत रवी बुगडे, अतुल लोखंडे, कृष्णा गवळी, शोएब खान, उमर मोहम्मद, मोहम्मद खान यांच्यासह बारा लोकांना लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास लोणावळा पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT