Lonavala Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Lonavala News: प्रेमप्रकरणातून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, २ सेकंदाच्या त्या व्हिडीओवरून बचाव पथकाने शोधला मृतदेह

Chakan Crime News: प्रेमप्रकरणावरून चाकणच्या तरुणाने लोणावळ्यातील राजमाची दरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. ७ दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला.

Priya More

दिलीप कांबळे, मावळ

लोणावळ्यातील राजमाची दरीमध्ये उडी मारून एका २७ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. पुण्यातल्या चाकण येथे हा तरुण राहत होता. सूर्यकांत रामद्याल प्रजापती असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह तब्बल ३७० फूट खोल दरीत आढळला. सूर्यकांतने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ बनवून तो घरी ठेवलेल्या मोबाईलवर पाठवला होता. याच व्हिडिओद्वारे आणि लोकेशनवरून लोणावळा शिवदुर्गच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेऊन बाहेर काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत प्रजापती (27 वर्षे) या तरुणाचं चाकणमधील तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. सूर्यकांतला त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी प्रेमप्रकरण असल्याचा संशय होता. याच संशयामुळे नैराश्यात असलेला सूर्यकांत ९ ऑक्टोबर रोजी घर सोडून गेला. त्यानंतर तो घरी परत आलाच नाही. सूर्यकांत दुसऱ्या दिवशीही घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी चाकण पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर सूर्यकांतचं शेवटचं लोकेशन हे लोणावळा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सूर्यकांतला शोधण्याचं मोठं आव्हान पोलिस आणि शिवदुर्गच्या पथकापुढे होतं. लोणावळा शिवदुर्ग पथक देखील यावरून लोकेशनची जुळवाजुळव करत होते. अखेर तो व्हिडिओ राजमाची येथील असल्याचे समोर आलं. व्हिडीओमध्ये पाठीमागे दिसत असलेला भाग तिथला असल्याचं स्पष्ट झालं.

त्यानंतर पोलिस आणि शिवदुर्ग पथकाने पुन्हा शोध मोहीम सुरू केली. दरीत काही फुटांवर सूर्यकांतचा मोबाईल दिसला. आणखी खाली गेल्यानंतर मृतदेहाची दुर्गंधी आली. मृतदेह त्याचा असल्याचं निश्चित झालं. राजमाची दरीत तब्बल ३७० फुटांवर सूर्यकांतचा मृतदेह आढळला. सात दिवसांनंतर सूर्यकांतचा शोध लागला होता. प्रेम प्रकरणातून सूर्यकांतने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT