Lonavala Bribe case News  AI Image
महाराष्ट्र

Bribe Case : पोलीस दलात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं

Lonavala Bribery Case News : लोणावळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! गुन्ह्यात मदत आणि कलमे कमी करण्याचे आमिष दाखवून २० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक नाथा रामकिसन केकान यांना रंगेहात पकडले.

Alisha Khedekar

  • लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर ACB ची कारवाई

  • २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं

  • तक्रारदाराच्या भावाविरुद्ध दाखल गुन्ह्यातील कलमे कमी करण्याचे आणि जामिनासाठी मदतीचे आमिष दाखवल्याचा आरोप

  • यापूर्वी वेगवेगळ्या टप्प्यांत १ लाख ३० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप.

दिलीप कांबळे, मावळ

लोणावळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. गुन्ह्यातून मदत करण्याचे आणि दाखल गुन्ह्यातील कलमे कमी करण्याचे आमिष दाखवून लाच मागणाऱ्या लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला ACB ने रंगेहात पकडले आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. नाथा रामकिसन केकान असे कारवाई करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील कलमे कमी करून देणे आणि जामीन मिळवण्यासाठी मदत करणे, असे आश्वासन देत केकान यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली होती. या कामासाठी त्यांनी यापूर्वी वेगवेगळ्या टप्प्यांतून एकूण १ लाख ३० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. मात्र, एवढे पैसे घेतल्यानंतरही त्यांची पैशांची मागणी थांबली नव्हती. १४ नोव्हेंबर रोजी त्यांनी तक्रारदाराकडे आणखी पैशांची मागणी केली.

गुन्ह्याच्या पुढील तपासात मदत करणे, आरोपीला दिलासा मिळवून देणे आणि आरोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी सहकार्य करणे, यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची दखल घेत विभागाने १६ नोव्हेंबर रोजी प्रथम पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले.

ठरल्याप्रमाणे लोणावळ्यातील मँगो गार्डनजवळील न्यायालय परिसरात तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक केकान यांना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: मोठी बातमी! आणखी एक महत्वाची योजना बंद, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Death : मृत्यूच्या क्षणी नेमकं काय जाणवतं? शरीर अन् मेंदूमध्ये होतात 'हे' ५ बदल

Maharashtra News Live Update: जिलेटिन- डिटोनेटरच्या स्फोटाने माथनी शिवार हादरले

Bajra Bhakri Recipe : थंडी वाढली की ताटात हवीच बाजरीची भाकरी! मऊ अन् लुसलुशीत बनवण्याची सोपी रेसिपी

रामा की श्यामा, थंडीत चहामध्ये कोणती तुळस टाकावी?

SCROLL FOR NEXT