Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांना 4000 कोटी रुपयांचा फायदा, भरसभेत फडणवीसांची मोठी घोषणा

Lok Sabha Election : देवेंद्र फडणवीस काल राळेगाव (यवतमाळ) येथील सभेत उपस्थितांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती दिली.

Ruchika Jadhav

सुरज मसुरकर

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आलीये. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव पडल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आचारसंहिता लागल्याने ते पैसे खात्यात जमा झाले नाही. आचारसंहिता संपताच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिलीये. देवेंद्र फडणवीस काल राळेगाव (यवतमाळ) येथील सभेत उपस्थितांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती दिली.

उपस्थितांना संबोधत करताना फडणवीसांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींनी शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले. तर राज्य सरकारने देखील ६ हजार रुपये दिले. जगभरात काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. रशिया -युक्रेन युद्ध, इरान - इस्रायल युद्ध त्यामुळे कापसावर निर्बंध आले. परिणामी कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले.

शेतकऱ्यांचं होणरं नुकसान पाहता राज्य सरकारने यावर निर्णय घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ४००० कोटीरुपये देण्यात येणार आहे. आचारसंहिता संपल्यावर जो काही फरक पिकांच्या किंमतीत असेल त्यानुसार त्या त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे तुमचं, सामान्य माणसाचं आणि गोरगरिबांचं सरकार आहे, असं देखील फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलंय. राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे महायुतीमधील सर्वच मोठ्या नेत्यांनी प्रचार सभांवर जोर दिलाय.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिलीये. तर महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे राजश्री पाटील आणि संजय देशमुख या दोघांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oil Tanker: भारताला मोठा दिलासा! ईराणी 'चक्रव्यूह'ला भेदून मुंबईत पोहचलं कच्च्या तेलाचे पहिले जहाज; पाहा VIDEO

Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

Homemade Facepacks: उन्हाळ्यात चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे काढायचे? हे 5 घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: घमुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

Entertainment News : अभिनेत्याचा २७ व्या वर्षी मृत्यू, घरातच आढळला मृतदेह, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT