Dipali Sayyed Saam TV
महाराष्ट्र

Dipali Sayyed: 'तिकीट वाटपात महिलांना डावललं जातंय'; शिंदे गटावर दिपाली सय्यद नाराज?

Dipali Sayyed News : लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात महिलांना डावललं जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने त्यांना शिंदेंच्या शिवसेनेतून डावललं जत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Ruchika Jadhav

रणजीत माजगावकर

Loksabha Election 2024 :

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद भोसले या आपल्याच पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात महिलांना डावललं जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने त्यांना शिंदेंच्या शिवसेनेतून डावललं जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आज माध्यमांशी संवाद साधताना दिपाली सय्यद यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात महिलांना डावललं जातंय, ही गोष्ट खरी आहे. मात्र अबकी बार 400 पार हा नारा असल्यामुळे पक्षाने ती भूमिका घेतली असेल, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

दिपाली सय्यद विधानसभा निवडणूक लढवणार

तसेत त्यांनी निवडणुकीबाबत आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. मी लोकसभा नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. विधानसभेसाठी माझी जोरदार तयारी सुरू आहे. लवकरच माझा मतदारसंघही जाहीर करेन, असंही दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. यामध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत ४०० पार जागा जिंकण्याता नारा दिलाय. भाजपने यासाठी आतापर्यंत उमेदवारांच्या नावाच्या दोन याद्या जाहीर केल्यात. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे आहेत. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची लोकसभा उमेदवारांची यादी समोर आलेली नाही. भाजपच्या महाराष्ट्रातील यादीत २० पैकी ४ महिला उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत.

रावेरमध्ये रक्षा खडसे, बीडमध्ये पंकज मुंडे, जळगावात स्मिता वाघ आणि नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांना संधी देण्यात आलीये. यावरून लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात महिलांना डावललं जात असल्याचा गंभीर आरोप दिपाली सय्यद यांनी केला आहे. तसेच त्या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT