Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News: 'शरद पवार गो बॅक', पवारांच्या पारनेर दौऱ्याला स्थानिक संघटनांचा विरोध; पोलिसांची मध्यस्थी यशस्वी

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Ahmednagar News: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पारनेरच्या दौऱ्यावर येणार आहेत. निघोज येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा व विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांना शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवार गो बॅक म्हणत या दौऱ्यांला विरोध केला जात आहे.

शरद पवार यांच्या या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने विरोध दर्शवला होता. समितीकडून कारखान्याच्या विक्रीत पवारांचा हात असल्याचा आरोप केला होता. कारखाना बचाव समितीकडून ‘शरद पवार-गो बॅक’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. (Lateat Marathi News)

याच पार्श्वभूमीवर रात्री जवळे ते देवीभोयरे रस्त्यावर ‘शरद पवार-गो बॅक’ असे लिहून आपली नाराजी कारखाना बचाव समितीने व्यक्त केली आहे. या आंदोलनाला भुमिपूत्र शेतकरी संघटना, भीम आर्मी , अन्याय निर्मुलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश भैरवनाथ ग्रामविकास मंडळ या सामाजिक संघटनांनी देखील पाठींबा दिला आहे.

मात्र पोलिस प्रशासनाने कार्यक्रमाचे आयोजक व आंदोलक यांच्यात मध्यस्थी केल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा कारखाना बचाव समितीने केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati: कोंडेश्वर वीटभट्टीवर महसूलची धडक कारवाई, अतिक्रमित झाेपड्याही जमीनदाेस्त; काेट्यावधींच्या नुकसानीचा वीटभट्टी मालकांचा दावा

Election Commission: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर; 'या' ४ विभागांत १० जूनला मतदान

Today's Marathi News Live : राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर

Narendra Modi : काँग्रेस आता अदानी-अंबानींचं नाव घेत नाही, किती पैसे घेतले? तेलंगणातून PM मोदींचा सवाल

Jalgaon Accident : भीषण अपघात; कारच्या धडकेत आईसह दोन मुले व भाच्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT