kolhapur, crime news Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : कापशी- लिंगणूर मार्गावर एलसीबीची माेठी कारवाई, बनावट सोन्याच्या बिस्किटांसह एकास घेतलं ताब्यात

एलसीबीने सापळा रचून ही कारवाई केली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : काेल्हापूर जिल्ह्यात गांजा आणि खाेटी साेन्याची बिस्कटं विक्री करण्याच्या हेतूने आलेल्या एकाला काेल्हापूर पाेलिस दलाने पकडले. त्याच्याकडून पाेलिसांनी 40 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Maharashtra News)

बनावट सोन्याची बिस्कीटं आणि गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या चंदगड मधील कालकुंद्री इथल्या एकाला कागल तालुक्यातील कापशी ते लिंगणूर मार्गावर सापळा लावून एलसीबीच्या पोलिसांनी जेरबंद केलं. नारायण उर्फ सागर पाटील असं अटक करण्यात आलेल्या संशयिताच नाव आहे.

त्याच्याकडून 2 किलो गांजा व बनावट सोन्याची बिस्कीटं असा 40 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर सागर पाटील याला बनावट सोन्याची बिस्किटे पुरविणाऱ्या चाळीसगाव मधील पुष्कर पाखले याचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेष मोरे,महादेव कुराडे,पोलीस अमंलदार महेश गवळी,महेश खोत यांच्या पथकाने केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT