Local Body Election Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी : मतदानाला २ दिवस शिल्लक असताना 'या' २ ठिकाणी निवडणुकीला ब्रेक, कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

Maharashtra Local Body Election News : साताऱ्यातील ९ नगरपालिकांपैकी फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिकांच्या निवडणुका नियमभंगामुळे उच्च न्यायालयाने रद्द केल्या असून आता २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल.

Alisha Khedekar

  • साताऱ्यातील ९ नगरपरिषदांपैकी २ निवडणुका पुढे ढकलल्या

  • नियमभंगावरून उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

  • २० डिसेंबर मतदान आणि २३ डिसेंबरला निकाल

  • राजकीय वातावरण तापले

राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली. त्यानुसार येत्या २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या काही नियमांचे पालन न केल्यामुळे उच्च न्यायालयाने साताऱ्यातील ९ नगरपालिकांपैकी २ नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलला आहे. या २ नागरपंचायतीतील निवडणुका २० डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकांचा निकाल २३ डिसेंबर रोजी होणार आहे.

महाराष्ट्रात येत्या २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडणार आहेत.२४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींची निवडणूक या दिवशी होणार आहेत. त्यानुसार सातारा, कराड, महाबळेश्वर, फलटण, वाई कराड, म्हसवड, रहिमतपूर, पाचगणी आणि मलकापूर या नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या लढती स्पष्ट झाल्या होत्या. मात्र या ९ नागरपंचायतींपैकी २ नागरपंचायतींच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांना आपला नामनिर्देशित पत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देता चिन्ह वाटप केले. तसेच या नियमांचे पालन न केल्यामुळे उच्च न्यायालयाने फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक रद्द करून पुढे ढकलली असून दोन्ही नगर परिषदेचा कार्यक्रम पुन्हा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

४ डिसेंबर रोजी दोन नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून नामनिर्देशित पत्र १० डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेण्याचा अवधी देण्यात आला आहे. तसेच २० डिसेंबर रोजी या दोन्ही नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडतील. मतदानानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल आणि २३ डिसेंबर रोजी दोन्ही नगरपंचायतींचा निकाल घोषित करण्यात येईल.

फलटण नगरपालिकेसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर रिंगणात आहेत. तसेच महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शिंदे, लोकमित्र जनसेवा आघाडीचे डी.एम. बावळेकर आणि अपक्ष उमेदवार कुमार शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या मंडपात अचानक शॉर्टसर्किट; मोठ्या ठिणग्यांनी भाविकांमध्ये घबराट|VIDEO

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरली

Maharashtra News Live Update: 7 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

बंद असलेले सर्व कबुतरखाने तातडीने सुरू करा; अन्यथा... जैन मुनींचा विधानसभा अध्यक्षांना इशारा

Monday Horoscope: नवीन जबाबदारीपासून आर्थिक नियोजनापर्यंत; वाचा तुमचं राशीभविष्य काय सांगतं?

SCROLL FOR NEXT