चंद्रपूर, मालवण आणि बीड अशा अनेक ठिकाणी पैसे वाटप झालेत, त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेत.
आचारसंहितेच्या भंगाचे सर्वाधिक आरोप सत्ताधारी भाजपवर करण्यात येत आहे.
निलेश राणेंचा मालवणमध्ये पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या.
पाहिलंत. ही पैसे वाटपाची दृश्य आहेत चंद्रपूरमधील. मतदानाच्या आधी भाजप उमेदवार अमोल चिल्लावारचे वडील पांडुरंग चिल्लावारकडून पैशांचं वाटप केलं जात असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. हे फक्त चंद्रपूरच नाही तर कोकणातही मालवणध्ये निलेश राणेंनी पैसे वाटपावरुन पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. पैसे वाटप करणाऱ्यावर कारवाईची मागणी निलेश राणेंनी केली. बीडच्या पेठ भागात मध्यरात्री पैशांचं वाटप सुरु असल्याचं उघड झालंय.
दुचाकीच्या डिक्कीत पैशाचे बंडल आणि राजकीय पक्षाची पत्रंक असल्याचं समोर आलंय. तर बीडमध्ये मतदानाला जाताना पैसे वाटप केली जात असल्याचं उघड झालंय. बुलढाण्यात 50 हजारांची रोकड जप्त केलीय. खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 महेबुब नगरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई केलीय. दरम्यान धुळ्यातही मतदानाआधी पैसे वाटप सुरु होती. मात्र पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांचा सुगावा लागताच त्यांनी धूम ठोकली.
माथेरान नगरपालिकेच्या मतदानावेळी पाच लाख रुपयांची कॅश पकडण्यात आली आहे. दरम्यान रोकड नेणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलंय. तर बदलापूरमध्येही पोलिसांच्या भरारी पथकाने 2 लाखांची रोकड जप्त केलीय. या निवडणुकीतील पैसे वाटपाच्या खेळावरुन खासदार सुप्रिया सुळे संतप्त झाल्या. त्यांनी थेट निवडणूकच रद्द करण्याची मागणी केलीय. निवडणुकीत पैशांचा खेळ सुरु आहे. पैसे वाटा आणि निवडणूक जिंका, असा नवा ट्रेंड आणला जातोय. त्यात सर्वाधिक आरोप सत्ताधारी भाजपवर आहेत. त्यामुळे पैसे वाटून निवडणुका जिंकण्याचे मनसुबे आखणाऱ्यांचे काळे कारनामे मुळासकट उद्ध्वस्त करण्यासाठी मतदारांनी लोकशाहीच्या मार्गाने जायला हवं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.