नगरपरिषद/ नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर
निवडणूकीसाठी अर्ज कसा करायचा?
निवडणूकीसाठा मतदान कधी होणार?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूकीची तारीख जाहीर केली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका २ आणि ३ डिसेंबर रोजी होणार आहे. या स्थानिक संस्थांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार आहे. मतदान हे २ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर लगेच ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी अर्ज कसा करता येणार आहे, पात्रता काय याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे मतदारांना त्यांच्या प्रभागातील नगरसेवक पदासाठी मतदान करायचे आहे. मतदान करताना मतदारांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही.
अर्ज कसा करायचा? (Nagarparishad/Nagarpanchayat Election Application Process)
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. तुम्हाला https://mahasecelec.in/ या वेबसाइटवर जाऊन सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर अर्ज भरावा लागणार आहे. एका प्रभागातून एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार अर्ज भरता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर या अर्जाची प्रिंट तुम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यायची आहे. तुम्हाला १० ते १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर असणार आहे.
निवडणूकीसाठी खर्च मर्यादा
निवडणूक खर्चातदेखील वाढ करण्यात आली आह. अ वर्गाच्या नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारास १५ लाख तर सदस्यांसाठी नऊ लाख रुपयांची खर्च मर्यादा असणार आहे. ब वर्गाच्या नगरपरिषदांमधील अध्यक्षपदाच्या उमेदवाराला ११ लाख २५ हजार रुपये तर सदस्यांसाठी साडेतीन लाख रुपयांपर्यंत खर्च करताना येणार आहे. क वर्गाच्या नगरपरिषदांमध्ये अध्यक्षांसाठी साडेसात लाख तर सदस्यांसाठी अडीच लाख रुपये खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. ड वर्गासाठी नगरपरिषदांमध्ये सहा लाख रुपये तर सदस्याला सव्वादोन लाख रुपयांचा खर्च करता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.