Lingayat community leaders intensify demand for separate religion status, sparking nationwide debate on politics and identity. Saam Tv
महाराष्ट्र

Lingayat Community: 'लिंगायत जात नाही तर धर्म' धर्मावरुन नव्या वादाची ठिणगी

Lingayat is a Religion, Not a Caste: लिंगायत जात नाही तर धर्म आहे... त्यामुळे स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याची मागणी करत लिंगायत समाज आक्रमक झालाय... मात्र लिंगायत धर्माला मान्यता दिली तर त्याचा देशाच्या राजकारण, समाजकारणावर काय परिणाम होणार आहे?

Omkar Sonawane

देशभर जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलंय.. त्यातच लिंगायत ही हिंदू धर्मातील जात नसून तो स्वतंत्र धर्म असल्याची थेट भूमिकाच लिंगायत समाजाने मांडलीय.. एवढंच नव्हे तर लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता देण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरलाय...

कर्नाटक सरकारने सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण जाहीर केलंय.. त्यातच आता लिंगायत समाजाची सर्वोच्च संघटना अपेक्स बॉडी ऑफ लिंगायत कम्युनिटीने सर्वेक्षणात स्वतःची ओळख हिंदू म्हणून नाही तर वीरशैव लिंगायत म्हणून नोंदवण्याचं आवाहन केलंय.. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडालीय.. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मात्र लिंगायत समाज हिंदू संस्कृतीचा भाग असल्याचा दावा केलाय..

लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक मान्यता देण्याची मागणी फक्त कर्नाटकमध्येच नाही. तर या मागणीचं लोण महाराष्ट्रातही पसरलंय.. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात पसरलेल्या लिंगायत समाजाची लोकसंख्या 85 लाख इतकी असल्याचा दावा केला जातोय.. मात्र प्रत्येक निवडणुकीत कोणत्या जिल्ह्यात लिंगायत समाजाची निर्णायक भूमिका असते?

लिंगायतबहुल जिल्हे

सोलापूर

कोल्हापूर

सांगली

लातूर

नांदेड

हिंगोली

धाराशिव

यवतमाळ

लिंगायत समाजाने फक्त स्वतंत्र धर्म म्हणून मान्यतेचीच नाही तर अल्पसंख्याक म्हणून दर्जा देण्याचीही मागणी केलीय.. त्यामुळे कर्नाटकात 17 टक्के तर महाराष्ट्रात ९ टक्के इतकी लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक ओळख मिळाल्यास त्याचा भाजपच्या हिंदू व्होट बँकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे... एवढंच नाही तर देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: वैशाख पौर्णिमेला करिअर अन् पैशांत होणार मोठी वाढ, या राशींचे नशीब चमकणार; वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील माणसाने फक्त मराठीमध्ये बोलावं - राज ठाकरे

Supriya Sule: यापुढे पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Raj Thackeray Speech : राजकीय नेत्यांमुळं महाराष्ट्राचं वाटोळं; राज ठाकरेंचा जोरदार प्रहार

पश्चिम बंगाल निकालाआधीच आला ममता बॅनर्जींचा 'एक्झिट पोल', देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारा अंदाज

SCROLL FOR NEXT