फ्रान्समध्ये भारतीयांचा डंका; कोल्हापूरच्या लीना नायर शनेलच्या सीईओ  Saam tv
महाराष्ट्र

फ्रान्समध्ये भारतीयांचा डंका; कोल्हापूरच्या लीना नायर शनेलच्या सीईओ

लीना नायर फ्रान्सच्या दिग्गज कंपनीच्या सीईओ झाल्यानंतर पुन्हा एकदा जगात भारतीयांचा डंका वाजला आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर - कोल्हापूरच्या (Kolhapur) लीना नायर यांच्या फ्रान्समधील लग्झरी ग्रुप शनेलच्या (Chanel) सीईओ (CEO) पदी नियुक्ती झाली आहे. शनेल ही एक प्रसिद्ध अशी फॅशन कंपनी आहे. लीना नायर याआधी युनिलवरसोबत काम करत होत्या. लीना नायर यांचे कोल्हापूरशी एक वेगळे कनेक्शन आहे. कोल्हापुरातील होलिक्रॉस शाळेमध्ये त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. लीना नायर फ्रान्सच्या दिग्गज कंपनीच्या सीईओ झाल्यानंतर पुन्हा एकदा जगात भारतीयांचा डंका वाजला आहे.

हे देखील पहा -

कंपनीच्या सीईओ पदी नियुक्तीनंतर लीना नायर यांनी ट्विट करत सर्व्यांचे आभार मानले आहेत. ट्विट करत त्या म्हणल्या की, माझा गौरव झाल्याचे वाटत आहे आणि शनेल सोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. लीना नायर या याआधी युनिलिव्हरमध्ये प्रमुख एचआर अधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी तिथून त्या पदाचा राजीनामा दिला. लीना या जानेवारीमध्ये शनेल कंपनीत रुजू होणार आहेत. शनेल ही कंपनी त्यांच्या हँडबॅग, ट्विड सूट आणि no.5 परफ्युम या उत्पादनांसाठी ओळखली जाते.

लीना नायर यांचे सुरुवातीचे शिक्षण कोल्हापुरातील होलिक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून आपले पुढचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्या जमशेदपूरला गेल्या. तिथे एमबीए पूर्ण केले. 1992 मध्ये लीना नायर यांनी युनिलिव्हरमध्ये काम सुरु केले. तिथे 2016 मध्ये त्यांनी प्रमुख एचआर अधिकारी पदापर्यंत मजल मारली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेल्वेच्या धडकेने दोघांचा मृत्यू,पंढरपूरमधील घटना

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT