अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकीचे पत्र; धमकीच्या पत्राने बीडमध्ये खळबळ विनोद जिरे
महाराष्ट्र

अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकीचे पत्र; धमकीच्या पत्राने बीडमध्ये खळबळ

50 लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून टाकू

विनोद जिरे

बीड - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या, परळी वैद्यनाथ देवस्थानला दोन दिवसापूर्वी धमकीचे पत्र मिळाले होते. यात 50 लाख रुपये द्या, अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून टाकू. अशी धमकी दिल्यानंतर पुन्हा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या, अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थांच्या नावाने देखील अशाच पद्धतीचे धमकीचे पत्र मिळाले असून यामुळे खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील देवस्थानांना धमकीचे पत्र देणारा कोण ? त्याच्या पोलिसांनी लवकरात लवकर मुसक्या आवळण्याची मागणी सामान्य जनतेकडून केली जात आहे.

दोन दिवसापूर्वी परळी वैजनाथ देवस्थानला 50 लाख रुपयांची मागणी करणारे पत्र मिळाले होते. असेच पत्र अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या नावाने पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पत्रावर नांदेड जिल्ह्यातील पत्ता देण्यात आला आहे..योगेश्वरी देवस्थान कमिटीच्या नावाने आलेल्या पत्रामध्ये 50 लाख रुपये द्या. नाहीतर मंदिर उडवून देऊ अशी धमकी सुद्धा देण्यात आली आहे. याप्रकरणी आंबेजोगाई पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Visapur Fort History: महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी विसापूर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Kalyan Rain : उल्हास नदीला पूर; पुलावरून पाणी वाहत असल्याने महामार्ग वाहतुकीस बंद

Highest egg consumption: कोणत्या देशात सर्वाधिक अंडी खाल्ली जातात?

SCROLL FOR NEXT