Leopard  Google
महाराष्ट्र

Ahmednagar Leopard: लोणी गावात नरभक्षक बिबट्याची दहशत; १५ दिवसात बिबट्याने घेतला २ लहान मुलांचा जीव

Leopard Terror : नगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. नगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देत टीम तयार करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे.

Bharat Jadhav

(सचिन बनसोडे, अहमदनगर)

Ahmednagar Leopard:

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात गेल्या १० दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या मुक्त संचारामुळे अनेक वाड्या वस्त्यांवर भितीचे वातावरण आहे. बिबट्याच्या हल्यात दोन मुलांचा मृत्यू झालाय. दरम्यान मृत झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांची भेट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेत त्यांचे सांत्वन केलंय. मंत्री विखे पाटील यांनी वन विभागाला बिबट्याला पकडण्यासाठी विशेष सूचना देखील दिल्या आहेत.(Latest News)

१५ जानेवारीला लोणी गावातील पंधरा वर्षे मुलाच्या मृत्यूनंतर २ दिवसांपूर्वी लोणी जवळीलच सादतपूर येथील अजून हर्षल गोरे या ५ वर्षीय लहान मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मृत मुलाच्या घरी जात कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर परिसरात शोध मोहीम राबवत असलेल्या वन विभागाच्या पथकांबरोबर चर्चादेखील केली. राज्यातून दोन पथक लोणी गावात दाखल झाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्वान पथकासह ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध सध्या सुरू आहे. नगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. नगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देत टीम तयार करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. बिबट्याचा संचार असलेल्या भागात शेतीच्या कामासाठी रात्रीच्या ऐवजी दिवसा लाईट देता येईल का, याविषयी सुद्धा प्रस्ताव महावितरणाकडे देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्यात.

या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी लोणी गाव आणि परिसरात जवळपास १६ पिंजरे लावण्यात आले आहेत. तर नाशिक आणि पुणे येथून आलेल्या रेस्क्यू टीमचा श्वान पथकासह ड्रोनच्या माध्यमातून या बिबट्याचा शोध सध्या सुरू असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT