Kalyan leopard Video  saam tv
महाराष्ट्र

Kalyan leopard Video : कल्याणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

कल्याणमध्ये नागारिकांच्या वस्तीत शिरलेला बिबट्याला बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

प्रदीप भणगे

Kalyan leopard News : कल्याणमध्ये नागारिकांच्या वस्तीत शिरलेला बिबट्याला बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. मुंबई संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली पथकाने १० तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला बेशुद्ध करून रेस्क्यू केलं. बिबट्याला जेरबंद केल्यामुळे त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. (Latest Marathi News )

कल्याणमध्ये (Kalyan) गुरुवारी पहाटे मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा भागात एका इमारतीत हा बिबट्या शिरला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांचां एकच गोंधळ उडाला होता. चिंचपाडा रोडवरील श्रीराम अनुग्रह टॉवर नावाच्या या इमारतीत हा बिबट्या शिरला होता. या बिबट्याने २ नागरिक आणि ३ जनावरांवर हल्ला केला. बिबट्या मानवी वस्तीत शिरल्यामुळे परिसरात एकच भीती पसरली होती.

बिबट्या वस्तीत शिरल्याची माहिती मिळाताच मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, बोरिवली टीम घटनास्थळी पोहोचली. या टीमने १० तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला बेशुद्ध करून रेस्क्यू केलं. रेस्क्यू करताना देखील या बिबट्याने वन विभागाच्या कर्मचारी आणि एका स्थानिकाला जखमी केले. मात्र, वन विभाग, पोलीस,अग्निशमन दलांच्या मदतीने हा बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

इमारतीमधील तिघांवर बिबट्याचा हल्ला

कल्याणमधील श्रीराम अनुग्रह या इमारतीमधील तीन लोकांवर हल्ला करून मग हा बिबट्या इमारतीत शिरला होता. त्यानंतर इमारतीमधील नागरिकांना रेस्क्यू करत बाहेर काढण्यात आलं.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी हा परिसर तसा दाट लोकवस्तीचा आहे. मात्र शेजारीच हाजीमलंगचा विस्तीर्ण घनदाट जंगलाचा डोंगर भाग आहे. या भागातून हा बिबट्या आला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दरम्यान, बिबट्या जेरबंद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : जोडीदारासाठी रोमँटिक टूर प्लान करताय? महाराष्ट्रातच आहे कमाल डेस्टिनेशन

Beed News : बीडमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश, काय असतील निर्बंध?

TET 2025 परीक्षेबाबत सर्वात मोठी अपडेट; अर्ज, परीक्षा शुल्क अन् वेळापत्रकाची माहिती एका क्लिकवर

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये एका दिवशी भटक्या कुत्र्यांनी घेतला 35 जणांचा चावा

आदित्य ठाकरे उद्या बुरख्यात लपून भारत पाकिस्तान मॅच बघतील; भाजप मंत्र्यांची बोचरी टीका|VIDEO

SCROLL FOR NEXT