Forest officials and rescue team trap the leopard after a dramatic two-hour chase in Kolhapur’s Tarabai Park area. Saam Tv
महाराष्ट्र

kolhapur Leopard: कोल्हापूर शहरात बिबट्याचा थरार! तब्बल तीन तास धुमाकूळ घालून अखेर जेरबंद

Leopard Creates Panic In Kolhapur City: पुणे, नाशिकनंतर कोल्हापूरातही बिबट्याची दहशत पसरली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्याने दोन तास धुमाकूळ घातला होता. वन विभागाने मोठ्या शर्थीने त्याला जेरबंद केलंय. पाहूया बिबट्याला पकडण्याचा थरार..

Girish Nikam

हाच तो बिबट्या...तब्बल तीन तास या बिबट्यानं कोल्हापूरकरांचं टेन्शन वाढवलं...

जाळीत पकडल्या गेल्यावरही बिबट्याची झटापट पाहा...तीन जणांना जखमी करुन हुलकावणी देणारा बिबट्या अखेर वनखात्याचं कर्मचारी आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केलं आणि कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. शहरातील मध्य भागातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या ताराबाई पार्क मधील हॉटेल वूडलँडमध्ये भरदिवसा बिबट्या घुसला आणि एकच खळबळ उडाली. मग काय जंगलातील या पाहूण्याला पकडण्यासाठी वन विभागाची धावपळ सुरु झाली. स्पेशल रेस्क्यू टीम आली.

मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्याने हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेतली. त्याठिकाणी काम करत असलेल्या माळ्यावर हल्ला केला. यामध्ये माळी किरकोळ जखमी झाला. यानंतर हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असेलल्या निखील कांबळे या युवकावरही हल्ला केला. वूडलँड हॉटेलमधून बिबट्याने बीएसएनल कार्यालयात उडी घेतली. यानंतर तो पुन्हा महावितरण कार्यालयातील एका ड्रेनेजमध्ये लपून बसला. दरम्यान त्याला पकडताना वनरक्षक ओंकार काटकर याच्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याला पकडण्यासाठी चारही बाजूंनी मोठ्या जाळ्या लावण्यात आल्या. आणि याच जाळीत तो अखेर अडकला.

दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या टीमने बिबट्याला पकडलं. मात्र हा प्रश्न इथंच सुटत नाही. वारंवार बिबट्याचा मानवी वस्तीतला वावर चिंतेची बाब आहे. पुणे, नाशिक जिल्ह्यात तर बिबट्याची संख्या कमालीची वाढली आहे. पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या 10 वर्षात तब्बल 60 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. आता कोल्हापूरातही बिबट्याची धास्ती बसली आहे. मानव आणि बिबट्यामधील संघर्षावर कधी तोडगा निघणार ? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics :...म्हणून विरोधीपक्षनेते पद हवंय; हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आक्रमक

‘सागरा प्राण तळमळला’, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या भव्य पुतळ्याचे अंदमानमध्ये अनावरण|VIDEO

दोन्ही डोळे बाहेर अन् गुप्तांगावर वार; तरूणाची क्रूर हत्या, बेडखाली रक्ताने माखलेला मृतदेह पाहून..

Maharashtra Live News Update: तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारी पर्यंत स्थगिती

Kitchen Hacks : घरातील काचेचे बाल्कनी दरवाजे लवकर घाण होतात? मग फॉलो करा या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT