Budget Session Gulabrao Patil and Aditya Thackeray Aggressive  Saam Tv News
महाराष्ट्र

Video : झाला कार्यक्रम; सभागृहात 'बाप' काढला, बाहेर ठसन दिली; गुलाबराव पाटील अन् आदित्य ठाकरेंमध्ये खडाजंगी

Gulabrao Patil and Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांची खोचक टिप्पणी गुलाबराव पाटील यांच्या चांगलीच वर्मी लागली. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी भर सभागृहात आदित्य ठाकरेंचा बाप काढला.

Prashant Patil

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे यांनी मंत्र्यांनी सभागृहात अभ्यास करुन यावा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर ते राखीव ठेवावे. मंत्र्याला सांगा अभ्यास करुन उत्तर द्या. पण यामुळे मंत्र्यांना त्यांचं खातं कळालंय की नाही, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या या टीकेचा रोख मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे होता. त्यानंतर सभागृहाबाहेरही आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील आमनेसामने आले आणि त्यांना पाहून पाटील चांगलं आक्रमक होताना दिसले. दरम्यान, आदित्य ठाकरे हे खाली बसल्यानंतर गुलाबराव पाटील लगेच उठून उभे राहिले. आदित्य ठाकरे यांची खोचक टिप्पणी गुलाबराव पाटील यांच्या चांगलीच वर्मी लागली. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी भर सभागृहात आदित्य ठाकरेंचा बाप काढला.अहो यांच्या बापाला कळालं होतं, म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी 'बाप' ऐवजी 'वडील' शब्द वापरुन सारवासारव केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेस एकटी, पुण्यात दादांमुळे मविआत बिघाडी

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची देशी दारू विक्रीच्या ठिकाणी छापेमारी

दुसऱ्या पक्षातून आले, स्वपक्षीयांना खटकलं; गिरीश महाजनांसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा

Samruddhi Expressway Block: समृद्धी महामार्गावर ३ दिवसाचा ब्लॉक; जाणून घ्या कुठे असेल बंद अन् कुठे असेल सुरू?

संतापजनक! आधी वडील, काका नंतर शेजारच्या आजोबानं १२ वर्षीय मुलीला वासनेचा बळी बनवलं, धक्कादायक कृत्यानं गावच हादरलं

SCROLL FOR NEXT