jamb samarath , jalna, karnataka, police, samarth ramdas swami
jamb samarath , jalna, karnataka, police, samarth ramdas swami Saam Tv
महाराष्ट्र

Jamb Samarth News : जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणी एलसीबीने कर्नाटकातून दाेघांना घेतलं ताब्यात

लक्ष्मण सोळुंके

Jamb Samarth : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील राम मंदिरातील मुर्ती चाेरी प्रकरणात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कर्नाटक राज्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. प्रदिर्घ काळानंतर मूर्ती चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकास मोठं यश आले आहे. (Jalna Latest Marathi News)

घनसावनगी तालुक्यातील जांब समर्थ गावातील रामदास स्वामी यांच्या पूर्वजांनी पंच धातूच्या सुमारे ७५० वर्षपूर्वी स्थापन केलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या आणि हनुमान, सीता, भरत शत्रुघ्न, आदींच्या १३ मूर्ती गेल्या दोन महिन्यांपूर्वी पासून चोरी गेल्या होत्या. या प्राचीन मूर्तीचा कुठल्याच प्रकारे ठाव ठिकाणा लागत नसल्याने भविकांकडून या मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा लागावा म्हणून आंदोलन देखील करण्यात आले होते. (Breaking Marathi News)

पोलिसांकडून (police) याचा तपास सुरू होता. मात्र ठोस पुरावा मिळत नसल्याने पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली होती. पोलिसांकडून राज्यभरात या प्रकरणी तपास सुरू होता. या प्राचीन पंचधातूंच्या मूर्ती चोरी प्रकरणात आंतराष्ट्रीय टोळीचा हात असण्याची शक्यता ही वर्तविली जात होती. त्यामुळे देशातील ६६ विमानतळ, पोर्ट, बंदरे या ठिकाणी असलेल्या यंत्रणेला ही दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. (Maharashtra News)

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमकडून राज्यातील मूर्ती चोरीच्या घटनांचा ही अभ्यास करवून या गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयन्त सुरू होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने कर्नाटक राज्यातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दोन्ही संशयित कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय. त्यामुळे मूर्तीचोरी प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन महिन्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणाचा छडा लागेल अशी खात्री अधिकृत सूत्रांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT