OBC leader Laxman Hake faces backlash after his controversial statement against the Mali community amid Maharashtra’s reservation battle. Saam Tv
महाराष्ट्र

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंचं माळी समाजावर वादग्रस्त वक्तव्य; ओबीसी आंदोलनात नव्या फटी?

OBC Agitation in Maharashtra Faces: लक्ष्मण हाकेंनी माळी समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन नवा आखाडा रंगलाय... मात्र हाकेंनी माळी समाजाबद्दल काय वक्तव्य केलंय... आणि या वक्तव्याचा ओबीसी आंदोलनावर काय परिणाम होऊ शकतो?

Bharat Mohalkar

लक्ष्मण हाकेंच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या याच वक्तव्यावरुन ओबीसी आंदोलनात फूट पडल्याचं चित्र आहे.. ओबीसी आंदोलनाच्या नेतृत्वावर बोलताना हाकेंनी माळी समाजाला टार्गेट केलंय..त्यावरुन आता ओबीसी समाजात दुफळी निर्माण झालीय.

माळी समाजावरील वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर लक्ष्मण हाकेंनी फोन करुन आपली बाजू मांडल्याची माहिती छगन भुजबळांनी दिलीय.

आपल्या वक्तव्यानंतर वाद उफाळून आल्याने लक्ष्मण हाकेंनी सारवासारव केलीय.. एवढंच नव्हे तर खोडसाळपणे व्हिडीओतून ओबीसींविरोधात षडयंत्र आखलं जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय...

राज्यात मनोज जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली.. त्यानंतर ओबीसीतून मराठा आरक्षणाला ब्रेक लावण्यासाठी लक्ष्मण हाके ओबीसींचा चेहरा म्हणून पुढं आले... त्यांनी राज्यभर दौरे करुन ओबीसी आंदोलनाची भूमिका मांडली.. आता मनोज जरांगे ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं म्हणून सरकारची नाकेबंदी करण्यासाठी 28 ऑगस्टनंतर मुंबईत दाखल होणार आहेत...

त्याच पार्श्वभुमीवर लक्ष्मण हाके जरांगेंविरोधात आक्रमक झालेत.. दरम्यान आता हाकेंच्या माळी समाजाविरोधातील वक्तव्यामुळे ओबीसी आंदोलनात फूट पडणार की हाकेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करुन ओबीसी समाज आरक्षण वाचवण्यासाठी एकीची वज्रमूठ आवळणार, याचीच उत्सुकता आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर-धाराशिव, बीडमध्ये पूरस्थिती, पावसामुळे हाहाकार

Sharad Pawar Setback : शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, पश्चिम महाराष्ट्रातील आमदार साथ सोडणार, भरसभेत केलं मोठं वक्तव्य

Shardiya Navratri 2025: नवरात्रीची दुसरी माळ, माता ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? जाणून घ्या

e-Aadhaar App: आता घरबसल्या काही मिनिटांत करता येणार आधार अपडेट; सरकार लाँच करणार नवीन अ‍ॅप

पावसाचं रौद्ररूप! संसार उघड्यावर, गावं पुराच्या विळख्यात; सोलापूरसह ३ जिल्ह्यांत शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT