Raj Thackeray News Saam Tv
महाराष्ट्र

Latur ZP Election Result : राज ठाकरेंच्या मनसेची लातूरमध्ये कमाल, २ शिलेदारांनी विजय आणला खेचून

Latur ZP Election Result : लातूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांत मनसेला दिलासा मिळाला आहे. पानगाव पंचायत समितीतून मनसेचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.झेडपी निकालांचे सविस्तर अपडेट वाचा.

Alisha Khedekar

राज्यात महापालिकेच्या रंगतदार निवडणुकांनंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी चुरशीची लढत सुरु आहे. महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला हार पत्करावी लागली मात्र जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मनसेला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. लातूरमध्ये पानगाव पंचायत समितीतून मनसेने दोन खाती उघडली आहेत.

लातूरमध्ये ५९ जिल्हा परिषद निवडणुकांसाठी हायव्होल्टेज लढत सुरु होती. या लढतीत दोन ठिकाणी मनसेने बाजी मारली आहे. लातूरच्या पानगाव गटातून मनसेचे सुनील नागरगोजे विजयी झाले असून याच गटातून मनसेच्या उमेदवार श्रीदेवी गालफाडे विजयी झाल्या आहेत. तर लातूरमधील जळकोट तालुक्यातील माळीहिप्परगा जिल्हा परिषद गटात नागेश्वरी सचिन केंद्रे काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. तसेच भाजपाला मोठा धक्का मिळाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या शर्यतीत आता कोणाची बाजी असेल आणि कोणाची हार असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. दरम्यान लातूर मध्ये विजयोत्सव साजरा केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahanu : १६व्या शतकातील 'हा' किल्ला आजही आहे जिवंत, तुम्ही कधी पाहिलाय का?

Black Tea for High Blood Pressure: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रूग्ण ब्लॅक टी पिऊ शकतात का?

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात, अवस्था पाहून चाहते इमोशनल; Video व्हायरल

Maharashtra News Live Update: पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २४ तास पूर्ण

Famous Actor : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाला लाच घेताना रंगेहात पकडलं, पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT