Latur : नेहरू युवा मंडळाच्या महिलांनी झाडे लावून केले नवीन वर्षाचे स्वागत! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur : नेहरू युवा मंडळाच्या महिलांनी झाडे लावून केले नवीन वर्षाचे स्वागत!

ओसाड स्मशानभूमीला वनराईने समृद्ध करण्याचा निर्धार लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील नेहरू युवा मंडळासह विविध संघटनेच्या व गटाच्या महिलांनी केला आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : उन्हाळ्याच्या दिवसात अंत्यविधीला जाणाऱ्या लोकांचे उन्हामुळे हाल होतात. ओसाड स्मशानभूमीला वनराईने समृद्ध करण्याचा निर्धार लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील नेहरू युवा मंडळासह विविध संघटनेच्या व गटाच्या महिलांनी केला आहे. याचाच एक भाग म्हणून डोंगराळ जमिनीवर झाडे लावून गावातील महिलांनी नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.

हे देखील पहा :

वाळवंट जमिनीला हरित करण्यासाठी सार्वजनिक स्मशानभूमीत झाडे लावून निर्धाराच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील बालाघाट डोंगर रांगांच्या खुशीत वसलेलं सहा हजार लोकसंख्येच हाळी खुर्द हे छोटंसं गावं आहे विविध जाती धर्मियांच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहे.

गावातील सार्वजनिक दहन भूमीला साधारण दहा एकर डोंगराळ आणि पाषाणाची जागा आहे. त्यात तीन दहन शेड, मात्र अंत्यविधीला आलेल्या नागरिकांसाठी एकही निवारा शेड नाही. एवढेच नव्हे तर आजूबाजूला सावलीत थांबण्यासाठी एकही झाड नाही. अशा ओसाड स्मशानभूमीला स्वर्ग भूमी करण्याचा निर्धार नेहरू युवा मंडळ, ग्रामपंचायत, एकल महिला संघटन व बचत गटाच्या महिलांनी केला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT