संदीप भोसले, लातूर
लातूरच्या उदगीरमध्ये पोलीस ठाण्याच्या गेटवर बोकड कापल्याने राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. लातूरमध्ये गुन्हेगारी कमी व्हावी, या अंधश्रद्धेतून बोकड कापल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली होती. पोलीस ठाण्याबाहेर बोकड कापतानाचा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. या चर्चांवर लातूर उदगीर ग्रामीण पोलिसांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Latest Marathi News)
लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गेटवर बोकड कापतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोवरून पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढू नये, यासाठी पोलिसांनी बोकड कापल्याची चर्चा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली.
बोकड कापतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अशी कृती का केली, असे तर्कवितर्क लोकांकडून लढवले जात आहेत. या व्हायरल फोटोनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलीस ठाण्याच्या बाहेर बोकड का कापलं, याबाबत लातूर उदगीर ग्रामीण पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गेटवर कापल्याच्या प्रकाराबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे.
कापलेला बोकड हा अंधश्रद्धेच्या प्रकारातून नाही,तर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने घेतलेल्या वाहनाच्या पार्टीसाठी बोकड कापल्याचं चौकशीत समोर आलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अशाप्रकारे पोलीस ठाण्याच्या गेटवर कृत्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उदगीर येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पोलीस अधिकारी म्हणाले, 'एका वृत्तपत्रात अंधश्रद्धेतून बोकड कापल्याचं वृत्त आलंय. या प्रकरणात प्राथमिक चौकशी करत आहोत. सदर प्रकार अंधश्रद्धेचा प्रकार नाही. उदगीर ग्रामीणचे पोलीस स्टेशनमधील दुय्यम अधिकारी यांनी एक चारचाकी खरेदी केली. यामुळे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी बकरा आणला होता. तरी देखील या प्रकरणात जे अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळतील, त्यांचा बाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्या येईल'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.