Latur : पुरात अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी तीन पथके! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur : पुरात अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी तीन पथके!

रेणापूर व लातूर तालुक्यातील पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुखरुप सुटका.

दीपक क्षीरसागर

लातूर : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लातूर यांच्याकडून पुरात अडकेल्या व्यक्तींची सुटका बचाव करण्यासाठी स्थानिक पातळीवर 3 पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. या पथकात रबर बोट ओबीएम मशिनसह इतर पुरांसबंधी आवश्यक साहित्य सामुग्रीसह अडकलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. या मध्ये पहिलं पथक रेणापूर तालुक्यातील सारसा, देवळा आणि दुसरं पथक घणसरगाव तिसरं पथक डिगोळ देशमुख या गावासाठी नियुक्त करण्यात आलं आहे.

हे देखील पहा :

मौजे डिगोळ देशमुख येथील पुरात अडकलेल्या 3 व्यक्तींची सुखरुप सुटका या पथकाकडून करण्यात आली. मौजे घनसावरगाव येथील पुरात अडकलेल्या 2 व्यक्तींची सुखरुप सुटका या पथकाकडून करण्यात आली. मौजे सारसा येथील पुरात अडकेल्या एकूण 40 व्यक्तीपैकी दुपारी 3-00 वाजेपर्यंत 25 व्यक्तींची सुखरुप सुटका केली असून उर्वरित अडकलेल्या 15 व्यक्तींची सुटका करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती लक्षात घेवून पुरात अडकलेल्या व्यक्तींचे मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ टीमला पुणे येथून पाचारण करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींचे स्थानिक बोटीने मदत व बचाव कार्य शक्य नसल्याने भारतीय वायु सेना पुणे येथून हेलिकॉप्टर (चॉपर) बोलावण्यात आलेले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रमशाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT