crime news saam tv
महाराष्ट्र

Latur: हळदीच्या कार्यक्रमात तलवार घेऊन नाचणाऱ्या पाच जणांना अटक

हा कार्यक्रम रविवारी हाेता.

दीपक क्षीरसागर

लातूर (crime news) : शहरातील (latur) एलआयसी कॉलनी परिसरात एका लग्नसोहळ्याच्या पूर्वसंध्येला हळदी कार्यक्रमात हातात तलवार, कत्तीसह धारदार शस्त्र घेऊन नाचणाऱ्या १५ विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला हाेता. या प्रकरणी पाेलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. (latur crime latest marathi news)

लातूर (latur) शहरातील एलआयसी कॉलनी परिसरात वास्तव्याला असलेल्या शुभम तुमकुटे याच्या लग्नसोहळ्याच्या (wedding) पूर्वसंध्येला हळदीच्या कार्यक्रमात धारदार शस्त्रे तलवार, कत्ती हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याचबरोबर गोंधळ, धिंगाणा घालत, मोठ्या आवाजात गाणे लावून नाचताना जवळपास १५ जण आढळून आले.

याबाबत विवेकानंद चौक पोलीस (police) ठाण्यात पोलीस नाईक विनोद ज्ञानोबा चलवाड (२९, रा. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनोज अशोक धोत्रे (२३ रा. गोपाळ नगर, लातूर), सुशांत दत्तात्रेय जाधव (रा. एलआयसी कॉलनी, लातूर), बालाजी सखाराम दणदिवे (रा. गोपाळ नगर, लातूर), रणजित रमेश मोहिते (रा. एलआयसी कॉलनी, लातूर), अमर बाळासाहेब ढोणे (रा. एलआयसी कॉलनी, लातूर), सलीम रज्जाक शेख (रा. एलआयसी कॉलनी, लातूर), शुभम तुमकुटे (रा. एलआयसी कॉलनी, लातूर) यांच्यासह इतर सहा ते सात जणांविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragic Incident: शेकोटीनं घेतला जीव; हॉटेलच्या रुममध्ये ५ जणांचा गुदमरुन मृत्यू

Maharashtra Live News Update: श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी

Wednesday Horoscope: लक्ष्मी उपासना चांगलं फळ देईल, या राशीची पैशाची समस्या वाढेल, वाचा बुधवारचे राशीभविष्य

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

Haunted Historical Places : पर्यटक 'या' किल्ल्याला भेट देण्यास घाबरतात, इतिहासात लपलंय गूढ

SCROLL FOR NEXT