Latur News Saam tv
महाराष्ट्र

Liquor Ban : ग्रामपंचायतसमोर महिलांनीच थाटले दारूचे दुकान; अवैद्य दारू विक्री विरोधात महिला आक्रमक

Latur News : लातूर जिल्ह्यातील वडवळ या गावात अवैध दारू सुरु आहे. गावात सर्रासपणे होत असलेली दारू विक्रीमुळे अनेकांना दारूचे व्यसन लागले आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : गावात सर्रासपणे दारूची विक्री केली जात आहे. या विरोधात महिला रणरागिणी आक्रमक झाल्या आहेत. वारंवार तक्रार करून देखील दारू विक्री बंद होत नसल्याने महिलांनी अनोख आंदोलन छेडले आहे. यात घरातील संतप्त महिलांनीच ग्रामपंचायतीच्या समोर दारूचे दुकान थाटले आहे.

लातूर (Latur) जिल्ह्यातील वडवळ या गावात अवैध दारू सुरु आहे. गावात सर्रासपणे होत असलेली दारू विक्रीमुळे अनेकांना दारूचे व्यसन लागले आहे. तरुण मुले देखील दारूच्या नशेत असतात. हा सर्व प्रकार लक्षात घेता गावातील दारू विक्री थांबविण्यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली होती. (Liquor Ban) मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई न करता दुर्लक्ष केले जात होते. यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत दारू विक्री विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

दुकान मांडत केला निषेध 

दारूची विक्री थांबवा या मागणीसाठी गावातील महिलांनीच (Gram Panchayat) ग्रामपंचायत समोर दारूचे दुकान मांडत निषेध केला. अनेकदा मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचे महिलांनी हे अनोखे आंदोलन केले आहे. ग्रामपंचायती समोर दारू दुकान मांडत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा महिलांनी प्रयत्न केला. यामुळे प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT