Latur Sonpeth Village Monkey Attack Saam TV
महाराष्ट्र

Monkey Attack : सोनखेड गावात माकडाची दहशत; अनेकांना घेतला चावा, ५० ते ६० जण जखमी

निलंगा तालुक्यातील सोनखेड गावात मागील तीन दिवसांपासून एका माकडाने धुमाकूळ घातला आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील सोनखेड गावात (Latur) मागील तीन दिवसांपासून एका माकडाने धुमाकूळ घातला आहे. या माकडाने आतापर्यंत 50 ते 60 जणांचा जखमी केले आहे. जखमींमध्ये महिला, पुरुष तसेच वयोवृद्ध लोकांचा समावेश आहे. चिंताजनक बाब म्हणजे यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. (Latest Marathi News)

सोनखेड गावातील नागरिकांनी या माकडाला हाकलून लावण्याचे प्रयत्न केले. पण या माकडाने अनेक नागरिकांच्या अंगावर झडप घालत त्यांना जखमी केले. त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी वनविभागाला  (Forest Department) या माकडाची माहिती दिली. दोन दिवसानंतर माकडाला पकडण्यासाठी वन विभागाचे 50 हून अधिक कर्मचारी गावात दाखल झाले. त्यांनी गावाला घेराव घातला. मात्र, हे माकड पळून जाण्यास यशस्वी ठरलं.

या माकडाने दोन दिवसांपूर्वी गावातील एक-दोघांना चावा घेतला होता. सुरूवातीला ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, शुक्रवारपासून या माकडाने गावातील नागरिकांवर हल्ला करण्यास सुरूवात केली. माणूस दिसताच हे माकडं त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करत होते. आतापर्यंत माकडाच्या हल्ल्या गावातील ५० ते ६० जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वानराच्या हल्ल्यात एक पुरुष व महिला गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामपंचायत व वन विभागाने गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना वन विभागाने दिलेल्या आहेत. गावातील सर्व व्यवहार ठप्प असून, भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, निलंगा तहसीलदारांना गावातील लोकांनी कळविले असल्याचे सरपंच नागनाथ स्वामी यांनी सांगितले.

सोनखेड येथे वानराला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने वन अधिकारी संतोष बन, देवणी विभागाचे वन अधिकारी नामदेव डिगोळे, डी. डी. मंगरुटे, एस. वाय. बडगणे, पारसेवाड आदींचे पथक गावात गस्त घालत असून, वानराच्या मार्गावर जाळे टाकण्यात आले आहे. मात्र, शुक्रवारी दुपारपर्यंत वानर वन विभागाच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पुन्हा पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT