Latur News Saam tv
महाराष्ट्र

Assembly Election 2024 : लातूरच्या टेंभुर्णी गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार; स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी घेतला निर्णय

Latur News : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मतदान करण्याचे आवाहन देखील या अनुषंगाने करण्यात येत असून सकाळपासून सुरु

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णी गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावातील प्रश्न सुटत नसल्याने गावकऱ्यांनी एकत्रित येत निर्णय घेतला आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मतदान करण्याचे आवाहन देखील या अनुषंगाने करण्यात येत असून सकाळपासून सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेत अनेक मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडत आहेत. मात्र गावात सुविधा पुरविल्या जात नसल्याने ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकत आहेत. मेळघाट परिसरातील सहा गावातील नागरिकांनी बहिष्कार टाकला आहे. यानंतर (Latur News) लातूर जिल्ह्यातील टेम्भूर्णी या गावातील नागरिकांनी देखील बहिष्कार टाकल्याचे समोर आले आहे. 

स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित 

मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी गावकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. अनेकदा आंदोलन करून आणि निवेदन देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. या गावात ९२३ इतकी  मतदार संख्या असून येथे मतदान झाले नाही; तर मतदानाच्या टक्केवारी व उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT