Latur News
Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur: सात दिवसातच पौराहित्य वर्ग अभ्यासक्रम केला बंद

दीपक क्षीरसागर

लातूर : राज्यात नव्हे तर देशात शिक्षणासाठी सर्वोत्तम शहर अशी ओळख निर्माण करणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयात संस्कृत भाषेतील श्लोक विद्यार्थ्यांना माहिती व्हावे, यासाठी सुरू केलेला अभ्यासक्रम केवळ सात दिवसात बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. (Latur Today News)

लातूर (Latur) शहर देशात शिक्षणाची पंढरी अशी ओळख इथल्या राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयासह अनेक महाविद्यालयांनी अपार कष्ट घेत निर्माण केली आहे. अशा महाविद्यालयापैकी नामांकित असलेले राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाने गेल्या आठवड्यात (Online Education) ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन्ही पध्दतीने पौराहित्य वर्ग सुरू करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये जाहीर केले. यासाठी 300 रुपये शुल्कात दोन पुस्तके दिली जाणार होती.

अचानक काढले दुसरे पत्र

दरम्यान हा अभ्यासक्रम आठवड्यातील शनिवार आणि रविवार या दोन दिवशी प्रत्येकी दोन तास होता. यात श्रीरुद्र सूक्त व इतर मंत्र व श्लोक शिकवले जाणार होते. पण 20 जुलैला नवीन पत्र काढत सदरील वर्ग बंद करण्यात आल्याचे घोषित केले. यामुळे इच्छुकांची तारांबळ उडाली.

अंनिसचा केला होता आरोप

दरम्यान एका आठवड्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह माधव बावगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अंधश्रध्दा पसरवण्यात येवू शकते. विज्ञानाच्या कसोटीवर पौराहित्या विषय टिकत नाही. आजतागायात शाहू महाविद्यालयात अंधश्रध्दा निर्मूलन करण्याचे राज्यातील केंद्रबिंदू असलेले ठिकाण आहे. शाहू महाविद्यालयाच्या कामकाजात पुरोगामी विचारांचा प्रभाव आहे हे योग्य नाही असा आक्षेप घेतला गेला. त्यावर 20 जुलैला सदरील पौराहीत्य वर्गाबाबत अंधश्रध्दा पसरवण्यास हातभार लागू शकतो; असा आरोप झाल्यानंतर अभ्यासक्रम बंद करून शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने महाविद्यालय काम करत असल्याचे प्राचार्य महादेव गव्हाणे यांनी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT