Latur-News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ५० जणांना घेतले ताब्यात

Latur News : लातूरच्या देवणी पोलीस ठाणे हद्दीत अनधिकृत तिरट जुगार खेळविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : लातूरच्या देवणी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत जुगार खेळणाऱ्या ५० जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल २ कोटी १३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. 

लातूरच्या (Latur) देवणी पोलीस ठाणे हद्दीत अनधिकृत तिरट जुगार खेळविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत कारवाई केली आहे. यावेळी जुगार अड्ड्यावर अनेकांचे घोडके जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. (Police) पोलिसांनी धाड टाकल्यानंतर काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना यश मिळाले नाही. 

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्या राज्यातील आणि परराज्यातील अशा ५० जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर या कारवाईत तब्बल २ कोटी १३ लाख ७५ रुपयाचा मुद्देमाला पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT