Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : मनोज जरांगेंच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, पती- पत्नीनं उचललं टोकाचे पाऊल!

Latur News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांनी सहा वेळा उपोषण केले. मात्र उपोषण करूनही सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने लातूरमध्ये पती- पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे. लातूरच्या अहमदपूरमध्ये पती- पत्नीने विषारी द्रव्य प्राशन केले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

लातूर (Latur) जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये ज्ञानोबा तीडोळे आणि त्यांची पत्नी चंचलाबाई तीडोळे या दोघांनी विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांनी सहा वेळा उपोषण केले. मात्र उपोषण करूनही सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. तसेच मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. मराठा आरक्षण मिळावे यासाठी राज्यात अनेकांनी आत्महत्या झाल्या आहेत. यानंतर पती- पत्नीने हा टोकाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. 

उपोषणाची दखल घेतली जात नसल्याच्या नैराश्यातून तीडोळे पती- पत्नीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दरम्यान सदर प्रकार लक्षात आल्यानंतर दोघांनाही लागलीच शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT