Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे रॅकेट; ११७१ बोगस लाभार्थी

Latur News : राज्य सरकारने मागील पाच महिन्यांपूर्वी महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला असून योजनेत राज्यातील महिलांनी अर्ज दाखल केले

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहिण योजनेत महिलांना लाभ मिळाला आहे. मात्र या योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. यात जिल्ह्यात तब्बल १ हजार १७१ बोगस लाभार्थी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वांचे अर्ज रद्द करण्यात येणार असून त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 


राज्य सरकारने मागील पाच महिन्यांपूर्वी महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला असून योजनेत राज्यातील महिलांनी अर्ज दाखल केले. लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये टाकण्यात आले. तर आता मार्च महिन्यापासून लाभार्थी महिलांच्या खात्यात २१०० रुपये दिले जाणार आहेत.

परराज्यातील लाभार्थ्यांचे रॅकेट 
दरम्यान या योजनेत बोगस लाभार्थी असल्याचे अनेक ठिकाणी समोर आले आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी केली जात असून योजनेसाठी ठरवून दिलेल्या निकषांमध्ये बसणाऱ्या लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अशातच लातूर व सांगली जिल्ह्यात परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे रॅकेट असल्याची माहिती समोर आली आहे.

११७१ बोगस लाभार्थी
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थींच्या मोठा आकडा समोर आला आहे. यात लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याच दाखून लॉगिन आयडी तयार करत जवळपास १ हजार १७१ बोगस लाभार्थ्यांचे फॉर्म भरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मागे मोठे रॅकेट आहे. 

बोगस लाभार्थ्यांचे दाखल करणार गुन्हे
दरम्यान चुकीच्या पद्धतीने शासनाची दिशाभूल करून खोटी कागदपत्रे ज्यांनी दिली असेल, ते लाभार्थी रद्द होतील. तसेच त्यांच्यावर गुन्हे देखील करण्यात येणार असल्याचं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज लातूर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आखाती युद्धाचा परिणाम, मनमाड शहरात एकमेव असलेला गोगॅस पंप झाला ड्राय

Kidney failure symptoms: पाठदुखी हे पहिलं लक्षण नाही; किडनी फेल होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने खेचलं कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Politics: २५-३० आमदारांसह राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार; राऊतांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे १५,३०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT