School Bus Driver suffers heart attack  saam tv
महाराष्ट्र

Latur News: हृदयद्रावक! धावत्या स्कूलबसमध्ये चालकाला हार्टअटॅक, स्वत: गेला पण 25 मुलांचे वाचवले प्राण

School Bus Driver Heart Attack News: अचानक महावीर काकांना कशाचा तरी त्रास होतो याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली आणि गाडीतील विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.

Chandrakant Jagtap

>>संदीप भोसले, साम टीव्ही

Latur School Bus Driver Heart Attack: लातुरमध्ये धावत्या स्कूलबसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याने प्रसंगावधान दाखवत 25 मुलांचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत हृदयविकाराच्या झटक्यामुळे चालकाचा मृत्यू झाला. मात्र त्यापूर्वी त्यांनी बसमधील विद्यार्थ्यांना काही होणार नाही याची काळजी घेत त्यांच्या प्राणांचं रक्षण केलं.

लातूर शहरातील श्री श्री रविशंकर शाळेची विद्यार्थी वाहतूक करणारी बस दुपारची शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघाली. बस चालक महावीर भोपलकर हे गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडण्याचे काम करतात. मात्र आज अचानक धावत्या बसमध्ये त्यांना हृदयामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या.

मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि बसमधील विद्यार्थी सुरक्षित असल्याची खात्री केली. अचानक महावीर काकांना कशाचा तरी त्रास होतो याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली आणि गाडीतील विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. मात्र वेदना वाढत गेल्या आणि त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. (Breaking News)

महावीर भोपलकर यांना कदाचित आपल्याला हृदयविकाराचा झटका आला आहे याची कल्पना आली होती. त्यामुळे त्यांनी तात्काळ त्यांनी गाडी बाजूला घेतली आणि वाहन बंद करून सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत का? याची खात्री केली. विद्यार्थ्यांनी मदतीसाठी केलेली आरडाओरड पाहून तेथे आलेल्या लोकांनी चालक महावीर यांना सीपीआर देण्याचा प्रयत्नही केला. (Marathi Tajya Batmya)

बसमधील एक विद्यार्थी धावत जाऊन जवळच असलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरला घेऊन आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चालक महावीर यांना तात्काळ लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तिथे त्यांना तपासून मृत घोषित केलं. याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना, शाळेमधील कर्मचाऱ्यांना आणि लातूरच्या स्कूलबस चालक संघटना यांना कळाली तेव्हा त्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. या घटनेने लातूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्रात बहुमत कोणाला ? मविआचा प्लान बी तयार

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT