Latur News Child Marriage Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime News: पहिल्या बाळंतपणामुळं उघड झाला धक्कादायक प्रकार; आई-वडील आणि पतीवर गुन्हा दाखल

बाळंतपणात उघडा पडला बालविवाह; आई- वडिलावर बालविवाहाचा, तर पतीवर बलात्काराचा गुन्हा

दीपक क्षीरसागर

Latur News : वयाच्या १६ व्या वर्षी करुन दिलेला बालविवाह पहिल्या बाळांतपणात उघडा पडला. डॉक्टरांनी दिलेल्या (Latur News) तक्रारीवरुन अल्पवयीन मुलीच्या आई- वडिलांवर बालविवाहाचा (Child Marriage) तर तिच्या नवऱ्यावर बलात्काराचा गुन्हा भादा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

लातूर तालुक्यातील खोपेगाव येथील एका १६ वर्षीय मुलीचा औसा तालुक्यातील गुळखेडा येथील तरुणासोबत गेल्यावर्षी खोपेगाव येथे विवाह लावून देण्यात आला होता. यानंतर सदर मुलगी गर्भवती राहिली.

परंतु अचानक तिचे पोट दुखत असल्यामुळे १० फेब्रुवारीला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर तिचा गर्भपात होवून अर्धवट गर्भ पोटात राहिल्याचे निदर्शनास आले.

डॉक्‍टरांनी दिली माहिती

शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन सदर अर्थवट गर्भ काढून टाकला. यावेळी या विवाहित मुलीचे वय १७ वर्षे असल्याचे आढळून आले. यामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर घटनेची माहिती भादा पोलिसांना दिली.

या माहितीच्या आधारे भादा पोलिसांनी या अल्पवयीन विवाहित मुलीचा जवाब नोंदवला १६ व्या वर्षी आई– वडिलांनी विवाह लावला असून पतीसोबत शारीरिक संबंध आल्याने गर्भ राहिल्याचा जवाब दिला आहे. यावरून भादा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT