Accident News Saam tv
महाराष्ट्र

Latur Accident News: काळीज पिळवटून टाकणारी घटना! बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; माय- लेकाचा मृत्यू

Latur Latest News: लातूर शहरातील औसा रोडवरील राजीव गांधी चौकात भरधाव बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.

Gangappa Pujari

संदीप भोसले, प्रतिनिधी...

Latur Accident News: लातूर शहरातील राजीव गांधी चौकात (Rajiv Gandhi Chouk) बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दुचाकीवरील महिला आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latur News)

याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर शहरातील औसा रोडवरील राजीव गांधी चौकात भरधाव बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. सोलापूर- उमरगा लातूर ही बस ( क्र. एमएच १४, बीटी १४३४) ने चौकामध्ये एक्टिवा (क्र. एमएच २४ बीएम ३७५४) गाडीला धडक दिली. या गाडीवर २६ वर्षीय महिला आणि तिचा लहान मुलगा प्रवास करत होते.

बसची धडक इतकी भीषण होती की अपघातामध्ये मायलेकाचा दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरातील बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. अपघातातील मायलेकांची नावे अद्याप समोर आली नाहीत. विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातही एक भीषण अपघाताची घटना १३ ऑगस्ट रोजी समोर आली. चंद्रपुरातील राजुरा तालुक्यातील धोपटाळा येथे पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये दुचाकीवरील पती- पत्नीसह लेकीचाही दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आंदोरा गावात पार पडला बळीराजा महोत्सव

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

Kalyan: दोन गटात तुफान राडा, दगडफेक- तोडफोड अन् हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली; VIDEO व्हायरल

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT